Uday Samant : मंत्री सामंतांनी अलिबागकरांना काय दिली गुड न्यूज?

Uday Samant
Uday SamantTendernama

Mumbai News मुंबई : अलिबाग शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता अलिबाग नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, तसेच अस्तित्वातील जलवाहिनीचे नूतनीकरण अशा रुपये ४९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामांना लवकरच सुरवात करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Uday Samant
Nagpur News : नागपुरातील वाहतूक कोंडी फूटणार का? 164 कोटींच्या टेंडरसाठी 'या' 2 कंपन्यांत स्पर्धा

अलिबाग शहरात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलिबागमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद होवून अलिबाग नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

Uday Samant
Gondia News : गोंदिया जिल्ह्यात 'या' जमिनीला का आलाय सोन्याचा भाव?

मंत्री सामंत म्हणाले की, अलिबाग येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, तसेच अस्तित्वातील जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी ४९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com