'तिसऱ्या मुंबई'ला बुस्टर डोस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा

तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
Third Mumbai
Third MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): महाराष्ट्राच्या शहरी आणि औद्योगिक पायाभूत विकासाला नवी दिशा देणारी मोठी घोषणा दावोस येथे करण्यात आली. ‘तिसऱ्या मुंबई’तील पहिले शहर म्हणून रायगड–पेण येथे ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) वार्षिक बैठकी दरम्यान मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ही घोषणा केली.

Third Mumbai
NA Land: शेतजमीन एनए करण्याच्या नियमांत सरकारने काय केले बदल?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, दावोस दौरा हा केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून ज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या शहरी नियोजनासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड–पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या १५ ते २० किलोमीटर अंतरावर हे नवे शहर विकसित होणार आहे.

बीकेसीच्या धर्तीवर नवा बिझनेस डिस्ट्रीक्ट

रायगड–पेण ग्रोथ सेंटर हे पब्लिक–प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्त्वावर विकसित केले जाणार असून, शासन, एमएमआरडीए आणि खासगी भागीदार एकत्र काम करणार आहेत. येथे ‘प्लग अँड प्ले’ पद्धतीने उद्योग तत्काळ सुरू करता येतील अशी पायाभूत सुविधा उभी राहणार आहे.

या ग्रोथ सेंटरमध्ये ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, फिनटेक इकोसिस्टम, उच्च पगाराच्या नोकऱ्या आणि ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेवर आधारित शहरी रचना असेल. बीकेसीच्या धर्तीवर येथे नवीन बिझनेस डिस्ट्रीक्ट आकाराला येणार आहे.

Third Mumbai
Nashik: उद्यापासून 2 दिवस विमानांचा थरार; नाशिकच्या डिफेन्स कॉरिडॉरचे होणार ब्रँडिंग

जागतिक कंपन्यांचा भक्कम प्रतिसाद

या घोषणेनंतरच सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले असून, जगभरातील दिग्गज कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे.
यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलंड, दुबई, सिंगापूर आदी देशांतील कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीतून आधुनिक, पर्यावरणपूरक आणि रोजगारनिर्मिती करणारे शहर उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अर्बन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्ट आणि मेडटेकवर भर

दावोस दौऱ्यात महाराष्ट्र सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले), टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह (लंडन) यांसारख्या आघाडीच्या संस्थांशी अर्बन प्लॅनिंग आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम्ससंदर्भात तांत्रिक सामंजस्य करार केले.
यामुळे शहरे, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने विकसित करता येणार आहेत.

आरोग्य क्षेत्रातही मेडटेक स्टार्टअप इकोसिस्टम उभारण्यावर भर देण्यात आला असून, शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी जागतिक कंपन्यांशी सहकार्याचा रोडमॅप ठरवण्यात आला आहे.

Third Mumbai
Nashik: गोदावरीतील पानवेली काढण्यासाठी 43 लाखांच्या होड्या

हरित औद्योगिक विकास आणि लॉजिस्टिक्स

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी हरित औद्योगिक कॉरिडॉर (Green Industrial Corridor) उभारणीवर चर्चा केली. यामुळे एमएसएमई, निर्यात आणि हरित गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच लॉजिस्टिक्स, ईव्ही, अर्बन मोबिलिटी, सप्लाय चेन कॉरिडॉर या क्षेत्रातही मोठ्या गुंतवणूक संधींचे संकेत दावोस दौऱ्यात मिळाले आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चर-केंद्रित विकासाचा नवा अध्याय

एकूणच, रायगड–पेण ग्रोथ सेंटरची घोषणा म्हणजे ‘तिसऱ्या मुंबई’च्या प्रत्यक्ष उभारणीची सुरुवात मानली जात आहे. विमानतळ, औद्योगिक पट्टे, लॉजिस्टिक्स, अर्बन मोबिलिटी आणि जागतिक दर्जाचे शहरी नियोजन यांच्या संगमातून महाराष्ट्राचा इन्फ्रास्ट्रक्चर-केंद्रित विकास अजेंडा अधिक भक्कम होणार असल्याचे स्पष्ट संकेत या घोषणेतून मिळत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com