मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मिनी विधानसभेच्या कामकाजाला खीळ;कारण

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतची एक हजार २९० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. अनेक मुख्य विभागांतील ही पदे रिक्त असल्यामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे मिनी विधानसभेच्या कामकाजाला एकप्रकारे खीळ बसल्यासारखी स्थिती आहे.

Eknath Shinde
शिंदे सरकारचा आणखी एक दणका; जलसंपदाच्या ३,८५८ कोटींच्या कामांना

ठाणे जिल्हा परिषदेत वर्ग एकची १२९ पदे मंजूर असून, त्यापैकी १०८ पदे भरलेली आहेत; तर २१ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची १०० पदे मंजूर असून ६५ पदे भरलेली आहेत; तर ३५ पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर अन्य विभागांचा कार्यभारदेखील सोपवण्यात येतो. वर्ग १ व २ नंतर मुख्य जबाबदारी वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांवर असते; मात्र वर्ग ३ ची ६,३०५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५,१४१ पदे भरलेली असून १,१६४ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. तसेच वर्ग ४ चीदेखील ३५७ पैकी २८७ पदे भरलेली असून ७० पदे रिक्त आहेत.

Eknath Shinde
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प गुंडाळला? आता या मार्गावर होणार...

जिल्हा परिषद प्रशासनावर ग्रामीण भागातील विकासकामांसोबत नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याची प्रमुख जबाबदारी आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण हे मोठे तालुके आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एकेका अधिकाऱ्यावर दोन-दोन विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासात्मक कामे करताना जिल्हा परिषद प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वर्ग १ व २ ची पदे सरकारकडून भरली जातात. रिक्त पदांबाबत सरकारला कळवण्यात आले आहे. वर्ग ३ ची पदे भरण्यासंदर्भात सरकारकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- रुपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी), जि. प. ठाणे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com