ठाणे, कोपर, तळोजा मेट्रो स्थानकांना मिळणार बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Bullet Train
Devendra Fadnavis: देशातील सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प महाराष्ट्रात

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल.

Bullet Train
Nashik: 'कुंभनगरी'ला मिळणार नवी ओळख! उपमुख्यमंत्री अजितदादांनी काय केली घोषणा?

महारेलने यासंदर्भात एका विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्राधिकरणास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून कसा राबवता येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या.

Bullet Train
Eknath Shinde: सी लिंक, बीकेसी आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कनेक्ट करा

हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे.

हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता-जाता येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com