शिंदे-फडणवीस सरकारचा 'या' प्रकल्पाला हिरवा कंदील; 1 लाख कोटींची...

Shinde, Fadnavis
Shinde, FadnavisTendernama

मुंबई (Mumbai) : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

Shinde, Fadnavis
आदित्य ठाकरेंना मोठा झटका; 'त्या' ६० हजार कोटीच्या कामांना स्थगिती

वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटींची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटींचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी असणार आहे.

Shinde, Fadnavis
सत्ताबदलाचा पुणे-नाशिक सेमी बुलेट ट्रेनला मोठा बूस्टर; भूसंपादन...

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हा उद्योग राज्यात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य देखील प्राप्त करून घेण्यात येणार आहे. हा उद्योग राज्यात आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होऊन राज्याच्या एकूण सकल उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

Shinde, Fadnavis
ठाण्यातील 'हे' रुग्णालय कात टाकणार;६७५ कोटींचा पुर्नविकास प्रस्ताव

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यापूर्वी केवळ चार देशांत असलेला हा उद्योग राज्यात यावा ही इच्छा आहे. हा उद्योग राज्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग उभारणीसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेचे (टाईम लाईन) पालन व्हावे अशी अपेक्षा आहे.

Shinde, Fadnavis
रेल्वे कोणाला देणार मुंबईतील 150 एकर जमीन मोफत? वाचा सविस्तर...

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे इतर अधिकारी, तसेच केपीएमजीचे अभिषेक प्रसाद, नितिका मेहता, अमित भार्गव, फॉक्सकॉनचे वेक्टर चेन, एरिक लिन, पिव्ही लिन, वेदांताचे सतेश अम्बरडर, प्रणव कोमेरवार, ऍवनस्टारचे ग्लोबल एमडी आकाश हेब्बर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com