शिवडी न्हावाशेवा सी-लिंकचे काम 'या'वर्षी होणार पूर्ण

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा नुकताच पार पडला. या प्रकल्पातील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाचे काम सुमारे 65 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Mumbai
बापरे! समृद्धी महामार्गावर कारसाठी भरावा लागेल एवढा टोल?

शिवडी आणि न्हावाशेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल 22 किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून 18 हजार कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोमवारी (ता.३) या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे 32 गाळे बसवून या 7.81 किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून 180 मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लोंचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे.

Mumbai
औरंगाबाद पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर;याचिकाकर्त्यावर दबाब

शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते 20 मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरलेपर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.

Mumbai
मुंबई महापालिकेत पुन्हा 'आश्रय’; चेंबूरच्या वसाहतीसाठी 'इतके' कोटी

या गाळ्यांच्या लॉचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करुन ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com