CM,PWD मंत्र्यांच्या जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था; अखेर नागरिक..

Agitation
AgitationTendernama

मुंबई (Mumbai) : खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याच ठाणे जिल्ह्यात नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल खड्ड्यातील चिखलात झोकून देऊन निषेध आंदोलन करावे लागले.

Agitation
डीपीसीचा निधी खर्चण्यास भाजपकडून काँग्रेसच्या 'या' आमदारास मोकळीक

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यातील काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटमधील सळ्या उघड्या पडल्यामुळे जीव घेणे अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील म्हारळगांव, पाडा, वरप, कांबा आणि पाचवा मैल येथील रहिवाश्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याच्या निषेधार्थ वरप येथील 'सेक्रट हार्ट' या शाळेच्या मुख्याध्यापकांसह पालकांनी चक्क महामार्गावरील खड्यातील चिखलात झोकून देत तीव्र आंदोलन केले.

Agitation
शिंदेंची भाजपवर कुरघोडी? फक्त शिंदे गटाच्या नेत्यांना खर्चाची मुभा

कूर्मगतीने सुरू असलेल्या या महामार्गावर म्हारळगांव, पाडा, वरप, कांबा ते पाचवा मैल दरम्यान काँक्रटीकरणाचे काम सुरू आहे. अवघ्या साडेतीन किलोमीटरचे हे काम तुकड्या तुकड्यात सुरू आहे. त्यामुळे जीव घेणी वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी सुरक्षेचे नियम पायतळी तुडवण्यात येत आहेत. ठेकेदार व महामार्ग बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या काँक्रिटीकरणचे काम जीवघेणे ठरत आहे.  

Agitation
मुंबई पूर्व उपनगरात होणार स्वच्छ पाणी पुरवठा; BMC १४ कोटी खर्चणार

या काँक्रीटमधील सळ्या उघड्यावर आलेल्या आहेत. काँक्रिटीकरणावर मारण्यात येत असलेल्या पाण्यामुळे रस्ता निसरडा होत असून त्यावर वाहनांसह दुचाकींचे अपघात होत आहे. गुळगुळीत रस्त्यावर रोड रोलर फिरवून तो आणखी जीवघेणा केल्याचे त्रस्त वाहन चालकांकडून सांगितले जात आहे. वरप येथील सेक्रट हार्ट या शाळेचा विद्यार्थी आईसोबत स्कुटीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. त्यामुळे संतप्त होऊन या शाळेचे मुख्याध्यापक अल्बिन अँथोनी यांनी पालकांसह या महामार्गावरील खड्यात झोकून देत तीव्र आंदोलन केले.

Agitation
लक्ष आहे आमचं! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर नियम मोडणारांना दणका

या दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना रोखले. मात्र, या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्याच्या कामामुळे परिसरातील धुळीने ग्रामस्थ, वाहनचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com