पाणी पुरवठा योजनेचा 'तो' 27 कोटींचा प्रस्ताव तातडीने सादर करा

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश
कर्जत - पूल - नव्याने बांधण्याचे आदेश
ram shindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे नियमित पाणीपुरवठा तातडीने उपलब्ध व्हावा यादृष्टीने महाविद्यालयापासून अंदाजे 20 किमी अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा जलसिंचनाद्वारे उपलब्ध करून देण्याचा 26.91 कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

कर्जत - पूल - नव्याने बांधण्याचे आदेश
मंत्रालयातच नियमांना हरताळ? मुख्य अभियंत्यांचे अधिकार थेट सचिवांच्या खिशात

विधान भवन, मुंबई येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीस राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव परिमल सिंह, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विश्रामगृह नुतनीकरण, अंतर्गत रस्ते निर्मिती, खेळाचे मैदान ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने पुढाकार घेऊन समन्वय राखावा, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.

बैठकीत मांगी मध्यम प्रकल्पामधून उपसा सलसिंचन योजना राबविणे, महाविद्यालयात विविध शेड्स, पाईप लाईन व कुंपणाचे काम करणे, महाविद्यालयात रस्ते, गोदाम, खेळाचे मैदान उभारण्याचे काम करणे, महाविद्यालयातील विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे यासंदर्भात चर्चा झाली.

कर्जत - पूल - नव्याने बांधण्याचे आदेश
Maharashtra News: राज्यातील 'ते' 13 हजार अधिकारी, कर्मचारी होणार हायटेक

कृषी महाविद्यालय सुरू होऊन आठ वर्ष झाली आहेत मात्र भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. ही कामे तातडीने पूर्ण व्हावीत यादृष्टीने कृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जलसंपदा इत्यादी विभागांनी परस्परांशी समन्वय राखावा आणि यासंदर्भात कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या महाविद्यालयाशी संबंधित असणारे सर्व प्रस्ताव तातडीने पाठवावेत त्यास शासन स्तरावरुन बिनाविलंब मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल, असे यावेळी स्पष्ट केले.

Tendernama
www.tendernama.com