Pune Ring Road News : पुणे रिंग रोडसाठी 'या' बलाढ्य कंपन्या लोअर बिडर; 17,500 कोटींची कामे

Ring Road
Ring RoadTendernama

Pune Ring Road News मुंबई : पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या टेंडरच्या (Pune Ring Road Tender) स्पर्धेत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL), नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (NECL), जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GRIL), पीएनसी PNC इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा (RSIIL) या बलाढ्य कंपन्या लोअर बिडर ठरल्या आहेत. १३६ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी तब्बल १७,५०० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Ring Road
Nagpur : तब्बल 70 हजार कोटींत विकला गेला देशी ब्रँड 'हल्दीराम'?

MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे व पिंपरीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. एमएसआरडीसीने प्रकल्पाच्या ९ बांधकाम टेंडरसाठी कमर्शियल टेंडर उघडल्यानंतर सर्वात कमी बोलीदार म्हणून या कंपन्यांची घोषणा केली आहे.

पुणे रिंगरोड हा एमएसआरडीसीद्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून ९ पॅकेजेस अंतर्गत केले जाईल. एमएसआरडीसीने जानेवारी २०२४ मध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह कमर्शियल टेंडर आमंत्रित केले होते. एप्रिल २०२४मध्ये या १२ कंपन्यांकडून २६ टेंडर प्राप्त झाली होती.

Ring Road
Pune Bengaluru Expressway News : पुणे-बंगळूर सुसाट; 50 हजार कोटींच्या द्रुतगती महामार्गाचे काम सुरू

राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच या कामासाठी १७ हजार ५०० कोटी रुपयांची टेंडर प्रसिद्ध केले आहे. निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने या प्रकल्पाच्या भूमिपूजन संदर्भातील कोणताही निर्णय घेणे शक्य होणार नाही. तसेच टेंडर उघडल्यानंतरही कंत्राटदारांना काम देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या काळात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून आचारसंहितेनंतर स्वीकृतीचे पत्र कंत्राटदारांना दिले जाणार आहे.

Ring Road
Mumbai News : कशी असेल मुंबईची नवी ओळख?

कसा असेल रिंगरोड -

बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
एकूण लांबी : १३६ किलोमीटर
एकूण रुंदी :११० मीटर
पूर्व रिंगरोड : ७१.३५ किमी
पश्‍चिम रिंगरोड : ६५.४५ किमी
 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com