Pune, Raigad जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीसांची दोन मोठ्या प्रकल्पांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Power
PowerTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

Power
Samruddhi Expressway: 'समृद्धी'वरील नवीन इंटरचेंजबाबत 'एमएसआरडीसी'चे अधिकारीच अंधारात

विधान भवन येथे यावेळी आयोजित या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको)चे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरिएक सर्वन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Power
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

राज्य शासनाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणानुसार २१०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ऊर्जा साठवण आणि स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

प्रकल्पाचा तपशील

चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प पुणे व रायगड जिल्ह्यांत विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार २१७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून अंदाजे २,५०० रोजगार निर्मिती होणार आहे.

Power
Mumbai: 25 वर्षांची प्रतीक्षा संपली; 'त्या' मुंबईकरांची होणार स्वप्नपूर्ती

महाराष्ट्रातील उदंचन जलविद्युत प्रकल्प

राज्यात आतापर्यंत एकूण ५५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर १.२८ लाख मनुष्यबळासाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

या योजनांनुसार औद्योगिक दराने सुमारे १,७६२.२१ कोटी रुपयांचा महसूल तर प्रतिवर्ष पुनर्भरणातून सुमारे १२८.३२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणे अपेक्षित आहे.

ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com