Mahagenco Koradi
Mahagenco KoradiTendernama

Nagpur : मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; कोराडीत होणार सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील मोठा वीज प्रकल्प

मुंबई (Mumbai) : नागपूर जिल्ह्यातील कामटी तालुक्यातील कोराडी येथे २ x ६६० मेगावॅट क्षमतेच्या कोळशावर आधारित सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास (Power Plant) मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Mahagenco Koradi
Nashik : शिंदे गटाची भाजपवर मात! नाशिकचे IT पार्क आता राजूर बहुल्यात

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महानिर्मिती कंपनीच्या जुन्या बंद होणाऱ्या १२५० मेगावॅट क्षमतेच्या संचाच्या बदल्यात हा १३२० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येईल. यासाठी येणाऱ्या १० हजार ६२५ कोटीच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. यापैकी ८० टक्के रक्कम म्हणजेच ८ हजार ५०० कोटी रुपये महानिर्मितीस विविध बँका आणि संस्थांकडून उपलब्ध करता येतील.

Mahagenco Koradi
Nashik : नाशिक तालुक्यात मध्यरात्री प्रशासनाची मोठी कारवाई; सारूळच्या 5 क्रशरवर...

तसेच २० टक्के म्हणजेच २ हजार १२५ कोटी रुपये पुढील ५ वर्षात टप्प्याटप्प्याने भागभांडवल म्हणून उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यात वेगाने होणारे औद्योगिकरण तसेच पायाभूत सुविधांमुळे विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com