Mumbai News : दक्षिण-मध्य मुंबईत पुनर्विकासाचे प्रश्न ऐरणीवर; राज्य सरकारची नुसतीच घोषणा...

Dadar
DadarTendernama

Mumbai News मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दादर-शिवाजी पार्क-माहीम, प्रभादेवीमधील रखडलेल्या इमारतींच्या बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Dadar
Sambhajinagar : 4 आयुक्तांना जे जमले नाही ते G Shrikant यांनी करून दाखविले!

त्याचबरोबर पोलिस वसाहतींचा पुनर्विकासाचा प्रश्नही रेंगाळत पडला आहे. स्थानिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळींकडून दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा या निवडणुकीत महायुतीला भोवणार अशी चिन्हे आहेत.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दादर-शिवाजी पार्कमधील अनेक इमारतींचे बांधकाम रखडले आहे. दादरची आर. के. बिल्डिंग, छपरा बिल्डिंग, मोहमदी मंझिल, अहमद बिल्डिंग, बाळकृष्ण सदन, कत्राटा मेन्शन अशा इमारतींमधील रहिवासी दादर सोडून विरार, नालासोपारा, वसई, कल्याणला स्थलांतरित झाले आहेत.

Dadar
Sambhajinagar : परवानगी नसतानाही AC च्या हवेने सरकारी अधिकारी चिल!

रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची राज्य सरकारने घोषणा केली, पण पुढे काही झाले नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात स्थानिकांचा रोष आहे. या इमारतींमधील रहिवासी उघडपणे नावानिशी बोलण्यास तयार होत नाहीत. या स्थानिक मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसण्याची चिन्हे आहेत.

Dadar
Haldiram For Sale : असे काय झाले की 'हा' देशी ब्रँड विकण्याची वेळ आली?

पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका बोलावल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना खूप आशा लागली होती, पण पुढे काहीच झाले नाही. पोलिसांच्या सेवानिवासस्थानांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे.

या मतदारसंघात माहीम आणि धारावीत पोलिस वसाहत आहे. माहीममध्ये 1 हजार 344 आणि धारावीतील पीएमजी कॉलनीत पोलिसांची 72 निवासस्थाने आहेत, पण सरकारने आम्हाला घरांच्या आश्वासनांपलीकडे काहीच दिले नाही, असे पोलिस कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com