Ravindra Chavan
Ravindra ChavanTendernama

Mumbai Goa Highway : एक लेन सुरू केल्याचे रविंद्र चव्हाणांचे दावे खोटे? मनसेने केला Video Viral

Published on

मुंबई (Mumbai) : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची (Mumbai Goa Highway) एक लेन सुरू केली आहे, अशी महिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केली होती. मात्र रविंद्र चव्हाण यांच्या या घोषणेचा पर्दाफाश मनसेने (MNS) केला आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मुंबई-गोवा महामार्गावर ग्राऊंड रिपोर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Ravindra Chavan
Nashik ZP : 110 कोटींच्या मिशन भगिरथमुळे एकाच पावसात 467 दलघफू पाणीसाठा

मनसेने ट्वीटमध्ये म्हटले की, गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरची एक लेन सुरू केली, अशी आरोळी ठोकणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दावे किती खोटे आहेत हे पाहा. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाताना काय हालअपेष्टा सहन करणार आहे याचे वास्तव दाखवणारा मनसे प्रवक्ते योगेश चिले ह्यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

व्हिडीओद्वारे योगेश चिले म्हणतात की, मी आता संगमेश्वरपासून ५ किमी अंतरावर आहे, इथून राजापूर येथे निघालो आहे. गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा हायवे एक लेन सुरू करु, अशी घोषणा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती.

Ravindra Chavan
अजित पवार सुसाट; विकास प्रकल्प निधी वा प्रशासकीय मान्यतेअभावी रखडवू नका!

मी या रस्त्यावर आहे, मला संगमेश्वरपासून ही सिंगल लेन कुठेच दिसली नाही. चिपळूणपासूनही मधे-मधे सिंगल लेन आहे. तर काही ठिकाणी ती गायब आहे. इतके काम बाकी आहे की दोन महिन्यातही हे काम पूर्ण होणार नाही. मग मंत्री महोदयांनी कुठल्या भरवशावर गणेशोत्सवाआधी रस्ता सुरू करण्याचा दावा केला हे आम्हाला कळत नाही, असे योगेश चिले यांनी म्हटले आहे.

Ravindra Chavan
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

आपण मंत्री झालात की लोकांना आवडतील अशा घोषणा करणे खूप सोपे असते. पण वस्तुस्थिचा विचार न करता घोषणा केल्या तर काय हालत होते हे तुम्हाला कळेल. मात्र गणेशोत्सवात या मार्गावर कोणतेही अघटित घडू नये ही प्रार्थना, असे योगेश चिले यांनी म्हटले.

Tendernama
www.tendernama.com