Mumbai News: मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी बीएमसीने काय घेतला निर्णय?

कचरा व्यवस्थापन अधिक गतिमान होणार, बीएमसी ९,७०० प्लास्टिक लिफ्टर्स, फावडी खरेदी करणार
Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात मुंबई शहराची स्वच्छता राखणे आणि कचरा व्यवस्थापन अधिक गतिमान करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत मुंबईतील विविध वॉर्डांसाठी ९ हजार ७०० जोड्या अत्याधुनिक प्लास्टिक लिफ्टर्स आणि फावडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

Mumbai
मुंबईतील आणखी 2 महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे

पावसाळ्यात कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता, वॉर्ड पातळीवरील सफाई कर्मचाऱ्यांना या आधुनिक साहित्यामुळे मोठे बळ मिळणार आहे.

पावसाळ्यात मुंबईत कचऱ्यामुळे पाण्याचे नाले आणि गटारे तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. अशा वेळी साचलेला ओला कचरा आणि गाळ तातडीने काढणे आवश्यक असते. या निर्णयामुळे पावसाळ्याच्या दिवसांत वॉर्ड पातळीवर कचरा उपसण्याची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

दोन महिन्यांच्या मर्यादित कालावधीत हा पुरवठा केला जात असल्याने, मुसळधार पावसाच्या काळातही मुंबईतील कचरा व्यवस्थापन चोख ठेवण्यास आणि पाणी साचण्याच्या समस्या रोखण्यास याची मोठी मदत होईल.

Mumbai
Mumbai: यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होणार का? 50 टक्के नालेसफाई पूर्ण, 31 मेपर्यंत 100 टक्क्यांचा 'अल्टिमेटम'

मुंबईच्या गल्लीबोळांतील आणि रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी सध्या सफाई कर्मचाऱ्यांना जुन्या लोखंडी साधनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. नव्या प्लास्टिक लिफ्टर्स आणि फावड्यांमुळे कर्मचाऱ्यांचा कचऱ्याशी थेट संपर्क येणार नाही. हे साहित्य वजनाने हलके आणि हाताळण्यास सोपे असल्याने कचरा उपसण्याचा वेग वाढेल आणि कर्मचाऱ्यांचे श्रमही वाचणार आहेत.

या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू झालेली ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदारांची आर्थिक पडताळणीही पूर्ण झाली आहे. महापालिकेने या साहित्याच्या गुणवत्तेबाबत कडक अटी घातल्या असून, पुरवठा केल्या जाणाऱ्या लिफ्टर्स आणि फावड्यांवर 'बीएमसी (एसडब्ल्यूएम)' असे वर्ष आणि उत्पादकाच्या नावासह कोरीव काम असणे बंधनकारक केले आहे. तसेच कंत्राटदाराने दिलेले नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासले जाणार असल्याने दर्जेदार साहित्याची हमी मिळणार आहे.

Tendernama
www.tendernama.com