MSRTC: 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटीची विक्रमी कामगिरी

MSRTC Bus
MSRTC BusTendernama

मुंबई (Mumbai) : एका दिवसात महामंडळाने (MSRTC) तब्बल २९.९५ कोटींची कमाई केली आहे. गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दमदार कामगिरी एसटी महामंडळाने केली आहे.

MSRTC Bus
Nashik : अनेक वर्षे प्रलंबित सटाणा बायपाससाठी अखेर 135 कोटी मंजूर

आर्थिक नुकसानीमुळे नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरणाऱ्या एसटीने ऐतिहासिक कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. एसटीची दैनंदिन प्रवासी संख्या ५७ लाखांवर पोहचली आहे.

तीन वर्षांपूर्वी कोरोनाची जागतिक साथ आणि त्यानंतर कामगारांच्या आंदोलनामुळे एसटी सेवा पूर्ण ठप्प झाली होती. परिणामी ‘लाल परी’चे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळल्याने महामंडळाचा संचित तोटा साडेबारा हजार कोटींच्या घरात पोहचला. राज्य सरकारने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यकुशलतेमुळे एसटीची प्रवासी संख्या अल्पावधीत विक्रमी संख्येने वाढली आहे.

MSRTC Bus
Good News! Pune महापालिकेत समाविष्ट 23 गावांनाही मिळणार 'ती' सवलत

२०२२ च्या जानेवारीत दररोज सरासरी फक्त तीन लाख प्रवाशांची वाहतूक एसटी करत होती. आता तब्बल ५७ लाख प्रवाशांची दररोज सुरक्षित ने-आण एसटीतर्फे होत आहे.

शंभर टक्के भारमान
कोरोना संकटाच्या आधी एसटी दररोज १८ हजार बसच्या माध्यमातून ६६ लाख प्रवाशांची वाहतूक करत होती. त्या वेळी सरासरी २३ कोटींचा महसूल मिळत होता. आता उन्हाळी सुट्यांमुळे १६ हजार ६०० पैकी १४ हजार बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यातून दररोज तब्बल ५७ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ विभागांत तर शंभर टक्के भारमान आहे. त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. ८ मे रोजी २९ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

MSRTC Bus
Good News : नागपूर महापालिकेत बंपर भरती; तब्बल 'एवढ्या' जागांसाठी

एसटीवर प्रवाशांनी विश्वास दाखवला आहे. शिवाय एसटी कर्मचारी आणि आगार व्यवस्थापकांनी उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराई काळात पूर्ण क्षमतेने बस रस्त्यावर उतरविल्याने आजचे यश मिळाले.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

एसटीने तीस वर्षांत पहिल्यांदा विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. आर्थिक विवंचनेत असलेली एसटी उभारी घेईल, असा विश्वास आहे. सर्व कर्मचारी व व्यवस्थापन दोघांचेही अभिनंदन!
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

MSRTC Bus
Nagpur : पारडी येथे बनणार देशातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन

एसटीचे दैनंदिन प्रवासी
सर्वसाधारण ः ३७ लाख
महिला ः १७ लाख
ज्येष्ठ नागरिक ः ३ लाख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com