Mira Bhayandar : मीरा भाईंदर DPR; आरक्षण बदलाची चौकशी होणार

Mira-Bhayandar Municipal Corporation
Mira-Bhayandar Municipal CorporationTendernama

मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर शहराची प्रारूप विकास योजना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहराच्या स्थानिक गरजा विचारात घेऊन काही सुविधांचा, बदलांचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्यास त्याबाबतच्या सूचना तपासून निर्णय घेण्यात येईल. तसेच सुधारीत योजनेत आरक्षण बदलण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत सांगितले.

Mira-Bhayandar Municipal Corporation
Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

सदस्य प्रताप सरनाईक यांनी याअनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. याबाबत माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, मीरा भाईंदर शहराची प्रारूप विकास योजना १९९७ साली मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ साली यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने नगर रचना अधिकारी यांनी महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व शासकीय विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक आयोजित करून आणि स्थानिक गरजा विचारात घेऊन सूचविलेले आरक्षण आदी बाबी विचारात घेऊन विकास योजना तयार केली.

Mira-Bhayandar Municipal Corporation
Nagpur Metro: नागपुरात मेट्रोची धाव आता 83 किलोमीटर पर्यंत! 6 हजार 708 कोटींची तरतूद

ही योजना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असून मीरा भाईंदर महानगरपालिकेने काही सुविधांचा, बदलांचा अंतर्भाव करण्याची विनंती केल्यानुसार त्याची गुणवत्ता विचारात घेऊन योजनेत समावेश करण्याबाबत अहवाल सादर करण्याबाबत संचालक, नगर रचना यांना कळविण्यात आले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

या अनुषंगाने लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याबाबत विनंती करण्यात येईल असे सांगून सुधारीत योजनेत आरक्षण बदलण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com