शिंदे सत्तेत आले अन् १२५ कोटींच्या मराठी भाषा भवन उभारणीला ब्रेक

Marathi Bhasha Bhavan
Marathi Bhasha BhavanTendernama

मुंबई (Mumbai) : मराठी भाषेचा विकास व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चर्नी रोड येथे प्रस्तावित ७ मजली मराठी भाषा भवनचे (Marathi Bhasha Bhavan) बांधकाम पूर्णपणे ठप्प झाले आहे. या कामावर १२६ कोटींचा खर्च अपेक्षित होते. हे काम एमआयडीसीमार्फत करण्याचे नियोजन होते. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठी भाषा भवनाच्या उभारणीला ब्रेक लागला आहे.

Marathi Bhasha Bhavan
गोराई-मनोरीसाठी BMCचे टेंडर; सांडपाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात

चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता मोकळा भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे. या ठिकाणी सुमारे २,१०० चौरस मीटर जागेवर मराठी भाषा भवनाची दिमाखदार वास्तू उभी राहणार होती. या प्रकल्पावर १२६ कोटी रुपये खर्च होणार होते. या मराठी भाषा भवनात २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ प्रेक्षकांची क्षमता असलेले अँम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा, एका मजल्यावर प्रशासकीय व कार्यालयीन जागा असेल. मराठी भाषा भवनाचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) करण्याची योजना होती.

Marathi Bhasha Bhavan
BMCची कोरोना काळातील टेंडर प्रक्रिया 'कॅग'च्या रडारवर

मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याची योजना होती, पण राज्यात नवे सरकार आल्यावर मराठी भाषा भवनाच्या उभारणीचे काम ठप्प झाले. पूर्वी प्रवेशद्वारावर मराठी भाषा भवनाच्या नियोजित इमारतीचे छायाचित्र होते, पण आता तेही गायब झाले आहे. यासंदर्भात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठी भाषा भवन बांधण्याचे काम एमआयडीसीला दिले. एमआयडीसी त्यांचे मुख्यालय बांधून मराठी भाषा भवन बांधणार आहे. पण एमआयडीसीला काम दिले नसते तर आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मराठी भाषा भवन बांधू. एमआयडीसीने आमचा एफएसआय आम्हाला द्यावा, अशी मागणी सुद्धा केसरकर यांनी केली. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com