मुंबईत ८६२७ जणांची स्वप्नपूर्ती; सरकारला ६६१ कोटींचा महसूल प्राप्त

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईत नोव्हेंबर महिन्यात ८ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून याद्वारे राज्य सरकारला ६६१ कोटींचा महसूल मिळाला आहे. यावर्षी मार्च महिन्यात शहरात सर्वाधिक १६ हजारांहून अधिक घरे विकली गेली आहेत.

Mumbai
अखेर महाराष्ट्रात कंपनी आली;'सिनार्मस' करणार 20000 कोटीची गुंतवणूक

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये घरविक्रीत चढ-उतार होत होता. यादरम्यान आठ ते १२ हजारांदरम्यान घरविक्री झाली होती. केवळ मार्चमधील घरविक्रीचा अपवाद होता. मार्चमध्ये सर्वाधिक विक्रमी अशी घरविक्री झाली होती. या महिन्यात तब्बल १६ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती. आतापर्यंतची ही सर्वाधिक घरविक्री आहे. आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये घरविक्री स्थिर असेल का, विक्रमी घरविक्री होईल का याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Mumbai
अखेर अदानींनी जिंकलं!; मुंबईतील 'ते' ५ हजार कोटींचे टेंडर खिशात

जानेवारी, मे, जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबरप्रमाणे नोव्हेंबरमध्येही घरविक्री १० हजाराचा पल्ला गाठू शकलेली नाही. नोव्हेंबरमध्ये मुंबईत आठ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला ६६१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नोव्हेंबरमधील नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस असून रात्री उशिरापर्यंत ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com