MHADA Konkan Lottery ला अल्प प्रतिसाद; 4,640 घरांसाठी 59 हजार अर्ज

MHADA
MHADATendernama

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (MHADA) कोकण मंडळाच्या सोडतीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत ५९,०५८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८३.२९ टक्के अर्जदारांनी अनामत ठेव जमा केली आहे. म्हणजेच, ४८,९१९ अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे.

MHADA
PM मोदींचे स्वप्न मराठवाड्यातील हा प्रकल्प लवकरच आणणार प्रत्यक्षात

‘आमचा डेटा अजूनही आरटीजीएस आणि एनइएफटीद्वारे केलेल्या पेमेंटसह अपडेट केला जात आहे आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या आकडेवारीची पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. मंगळवारपर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल,’ असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवार (ता. २७) पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यासाठी, सोडतीतून वगळण्यात आलेले अर्जदार आपले आक्षेप नोंदवू शकतात आणि त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात. त्यानंतर पात्र सहभागींची अंतिम यादी ४ मे रोजी जाहीर केली जाईल.

म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी सुरुवातीपासूनच अत्यल्प प्रतिसाद होता. एकूण अर्जदारापैकी फक्त ५० टक्के अर्जदारांनी गेल्या आठवड्यापूर्वी अनामत रकमेचा भरणा केला होता. साधारणपणे, जवळपास दोन महिन्यांपर्यंतच्या सोडत कालावधीसाठी रक्कम अडकवू इच्छित नसल्यामुळे अनेक अर्जदार अंतिम तारखेला अनामत रक्कम जमा करतात. अर्जदाराला प्रत्येक अर्जासाठी अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम उत्पन्नाच्या श्रेणीनुसार बदलते. १० मे रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे.

MHADA
Pune: 'या' एका निर्णयाने बदलली पुण्यातील पुनर्विकासाची गणिते?

८ मार्च, रोजी गृहनिर्माण प्राधिकरणाने १४ भूखंडांसह, ४,६४० घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. ही घरे मुंबई महानगर प्रदेशाच्या विविध भागात तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात पसरलेले आहेत. ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागात उपलब्ध आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com