Hasan Mushrif: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाबाबत काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ?

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Hasan MushrifTendernama
Published on

मुंबई (Mumbai): सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास गती देऊन निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामांबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी

मंत्रालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बांधकामाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी एकूण ४०.१० कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबतही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात येत असून, महावितरणकडून वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Mumbai: वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांबाबत मंत्री हसन मुश्रीफांनी काय दिले आदेश?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढविण्याबरोबरच कोकण विभागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

सिंधुदुर्गातील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.

Tendernama
www.tendernama.com