Devendra Fadnavis : अखेर फडणवीसांचा प्लॅन सक्सेसफुल! 'त्या' वास्तुसाठी सरकार मोजणार तब्बल 1600 कोटी

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

पुणे (Pune) : महाराष्ट्र सरकारने नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची (Air India) प्रतिष्ठित इमारत खरेदी केली आहे. तिचे मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती.

Devendra Fadnavis
Nashik : महापालिकेकडून सिंहस्थ कामांसाठी 500 कोटींचे कर्जरोखे उभारण्याची चाचपणी?

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितले होते की, त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार अंतर्गत 2021 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार अंतिम झाला नाही.

Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांवर 8 हजार कोटींची मेहेरनजर

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांचे लक्ष्य बनली होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता.

मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता. खरेदी सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाले आणि हा सौदा पुढे जाऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com