'त्या' फ्लोटिंग सौर उर्जा प्रकल्पाचे ५१४ कोटीचे टेंडर एसजीव्हीएनला

solar plant
solar plantTendernama

मुंबई (Mumbai) : चंद्रपुरात प्रस्तावित महाराष्ट्रातील पहिल्या फ्लोटिंग सौर उर्जा प्रकल्पाचे काम सार्वजनिक क्षेत्रातील 'सतलज जल विद्युत मंडळा'ला (एसजीव्हीएन) ५१४ कोटींत मिळाले आहे. एसजीव्हीएन ग्रीन एनर्जीसह 'आवाडा' या दोन कंपन्यांमध्ये हे टेंडर मिळवण्यासाठी रस्सीखेच होती. अखेर एसजीव्हीएनने ३.९३ रुपये प्रति युनिट इतका कमी दर निश्चित केल्याने हे टेंडर त्यांना मिळाले आहे. महाजेनकोने यासाठी १०५ मेगावॅट क्षमतेचे टेंडर निश्चित केले होते.

solar plant
नरिमन पॉइंट ते विरार तासातच; २१००० कोटींच्या सी-लिंकची जबाबदारी...

या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी टेंडर भरले होते. एसजीव्हीएन ग्रीन एनर्जीसह 'आवाडा' ही दुसरी कंपनी सुद्धा यात सहभागी झाली होती. यासाठी ई-रिव्हर्स बोली १९ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली. एसजीव्हीएनने तेव्हा ४.१० रुपये प्रति युनिट व 'आवाडा'ने ४.३५ रुपये दर ठेवले होते. नंतर एसजीव्हीएनने यात सुधारणा करीत ३.९३ रुपये दर केला. हा प्रकल्प जलस्रोताच्या २०० हेक्टर परिसरात साकार होईल. या प्रकल्पाचे दोन लाभ आहेत. यासाठी जागेची गरज पडणार नाही. हाच प्रकल्प जमिनीवर उभा केला तर जवळपास ४२० एकर जागा लागली असती. तसेच या प्रकल्पामुळे जलस्रोताचे बाष्पीकरण कमी होईल.

solar plant
मुंबई, ठाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुड न्यूज!

चंद्रपुरातील इरई धरणावर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. महाजेनकोने यासाठी १०५ मेगावॅट प्लांट क्षमतेचे टेंडर निश्चित केले होते. या पूर्ण प्रकल्पाचा खर्च ८५० कोटी रुपये इतका आहे. इरई धरणावरील प्रकल्पाचे काम १५ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. टेंडर अटीनुसार एसजीव्हीएनला येथे तयार होणारी वीज ३.९४ रुपये प्रति युनिटच्या दरावर विकावी लागेल. या पूर्ण प्रकल्पाचा खर्च ८५० कोटी रुपये इतका आहे. एसजीव्हीएन यासाठी वीज वहन यंत्रणा सुद्धा तयार करेल. दरम्यान, नवी मुंबई महापालिका सुद्धा १०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणार आहे. अद्याप हे टेंडर निश्चित झालेले नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com