Bullet Train : पहिल्या ओपन वेब गर्डर ट्रस ब्रीजचे यशस्वी लॉन्चिंग

Bullet Train
Bullet TrainTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ५०८.१७ किमीच्या पॅकेज P1(C) साठी त्यांच्या पहिल्या ओपन वेब गर्डर (OWG) ट्रस ब्रीजचे लॉन्चिंग पूर्ण करण्यात यश आले आहे. या पुलाचे वजन १४८६ मेट्रिक टन इतके आहे. एम जी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.ने गेल्या आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण केले.

Bullet Train
Naredra Modi : मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक धावणार बुलेट ट्रेन

वाहतूक नियंत्रण आणि पॉवर ब्लॉकचा वापर करून ९९.६ मीटर लांबीचा स्टील पूल भारतीय रेल्वेच्या गुजरातच्या वडोदरा विभागातील कंजरी बोरियावी आणि उत्तरसांडा स्थानकांदरम्यानच्या मेन-लाईन ट्रॅकवर बांधण्यात आला. मुंबई अहमदाबाद हायस्पीड प्रकल्पाच्या दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे लाईनवर ६२ अंशांच्या तिरकस स्थानावर अनेक रोलर्स आणि हायड्रॉलिक जॅक वापरून हा पूल उभारण्यात आला आहे.

गुजरातमधील गुडलक इंडिया समूहाने हा पूल तयार केला असून त्याची उंची १४.० मीटर आणि रुंदी १४.३ मीटर आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने या पुलासाठी ऑगस्ट २०२१ मध्ये २६१.२४ कोटींचा करार केला होता. पुलाच्या असेंब्ली आणि लॉन्चला आधार देण्यासाठी ट्रेस्टल उभारणीचे काम एक वर्षापूर्वी एप्रिल २०२३च्या सुरुवातीला सुरू झाले होते. अंदाजे ७०,८६५ मेट्रिक टन पोलाद या मार्गातील २८ स्टील पुलांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येईल.

Bullet Train
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यांसाठी Good News! 900 कोटीतून तयार होणार 106 किमीचा...

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर प्रकल्पासाठी एकूण 1.08 लाख कोटी खर्च होणार आहेत. केंद्र सरकार 'एनएचएसआरसीएल'ला 10 हजार कोटी रुपये देणार आहे. यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा समावेश असून ते प्रत्येकी 5,000 कोटी रुपये देतील. उर्वरित रक्कम जपानकडून 0.1 टक्के व्याजाने कर्जाद्वारे घेतली जाणार आहे. हा प्रकल्प एकूण 508 किमी इतका लांब आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कामांनाही सध्या गती आली आहे. तसेच या मार्गामध्ये पहिल्यांदाच समुद्राखालील बोगद्यांमधून बुलेट ट्रेन कॉरिडोअर तयार करण्यात येणार आहे. सुरत आणि बालिमोरादरम्यान या मार्गावरील चाचण्या 2026 मध्ये सुरु होतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com