BMC Tender: न्यू माहीम शाळेच्या पुनर्बांधणीसाठी 55 कोटींचे टेंडर

पुनर्बांधणीदरम्यान शेजारील इमारती व स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळेच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल ५५ कोटी रुपयांचा खर्च करुन याठिकाणी आधुनिक व सुसज्ज शाळा उभी राहणार आहे.

BMC
शेतकऱ्यांचा विरोध मावळला; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन जोरात

माहीम, धारावी परिसरातून मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी या शाळेत येतात. तीन वर्षांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून शाळेची घोषणा करण्यात आली होती. पुनर्बांधणीदरम्यान शेजारील इमारती व स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सेफ्टी नेट्स, बॅरिकेडिंग यांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

महापालिकेच्या आराखड्यानुसार, १० मजली शाळेची इमारत उभारली जाणार आहे. या नव्या आरसीसी रचनेत ३ जिने, ४ लिफ्ट्स, अंडरग्राउंड व ओव्हरहेड टाक्या तसेच सुरक्षा केबिन असेल. शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक्स घालून परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

शाळा परिघाभोवती मजबूत भिंत उभारून दोन प्रवेशद्वारही दिले जाणार आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणाली बसवली जाणार असून, पावसाचे पाणी साठवण्याची सोय करण्यात येणार आहे.

BMC
Exclusive: निधी मिळूनही रुग्णालयांतील यांत्रिकी स्वच्छतेला ब्रेक? रुग्णांचे हाल; प्रशासकीय स्तरावर गोंधळ

न्यू माहीम शाळेची इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केल्याने पालक संतापले होते. मोरी रोडवरची शाळा न बांधताच दुसरी मराठी शाळाही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक पालक, मराठी भाषाप्रेमींकडून याला कडाडून विरोध झाला. मोरी रोडची शाळा बांधून पूर्ण करावी आणि त्यानंतर न्यू माहीम एम.एम. छोटानी शाळेची इमारत पुनर्बांधणीसाठी घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्था, पालक यांच्याकडून होत होती.

जुनी आणि धोकादायक झालेली शाळेची इमारत पाडून याठिकाणी उंच आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज, अशी सुरक्षित इमारत उभारली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com