BMC Tender News : मुंबई महापालिका 700 कोटींचे 'ते' टेंडर का करणार रद्द?

BMC
BMCTendernama

BMC Tender News मुंबई : दक्षिण मुंबईतील 136 वर्षे जुना असलेला हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय नव्याने बांधण्याचे तब्बल ७०० कोटींचे टेंडर आता मुंबई महानगरपालिका रद्द करणार आहे.

BMC
Nashik : सिटीलिंक बस वाहक पुरवठादार टेंडरला आचारसंहितेची साडेसाती

पुनर्बांधणीनंतर दररोज सुमारे 150 दशलक्ष लिटरची क्षमता 190 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना होती. मात्र हा जलाशय नव्याने बांधायचा झाल्यास शेकडो झाडांचा बळी जाणार होता. शिवाय या ठिकाणच्या मोकळ्या जागेलाही फटका बसणार होता. त्यामुळे नागरिकांकडून नव्याने जलाशय बांधण्याच्या प्रकल्पाला विरोध केला जात होता.

सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोड परिसरात पाणीपुरवठा केला जातो. मलबार हिल जलाशयाला तब्बल 136 वर्षे झाल्यामुळे दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.

BMC
ठाणे-कळवा ते कल्याण समांतर रस्ता बांधणार; श्रीकांत शिंदे यांची कल्याणच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कशी आहे?

जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प 2017 मध्ये 185 कोटी इतका प्रस्तावित होता. मात्र तो आता 700 कोटींवर पोहोचला होता. शिवाय मलबार हिल जलाशयाच्या 5 टाक्यांची जलधारण क्षमता एकूण 147.78 दशलक्ष लिटर असताना त्यामधील केवळ 79.73 दशलक्ष लिटर पाणीसाठाच वापरला जातो, मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट महापालिका प्रशासनाने का घातला, असा प्रश्न पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या स्थानिकांनी उपस्थित केला होता.

तसेच नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल 393 झाडांची कत्तल होणार होती. हा जलाशय केवळ दुरुस्तीने सुस्थितीत येऊ शकतो असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिल्यामुळे हे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com