Mumbai: बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी आता GeM पोर्टलद्वारे

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची माहिती
Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): बीएमसीच्या आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढविणे आणि रुग्णसेवा अधिक सुलभ करण्यासाठी भाजप-नेतृत्वाखालील बीएमसी सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे करणार असून, बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमधील खाटांच्या उपलब्धतेची रिअल-टाइम माहिती दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित करणार आहे. हा डॅशबोर्ड एक महिन्याच्या आत तयार होईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.

Mumbai
Mahavitaran Restructuring: महावितरणच्या विभाजनाचा सरकारने का घेतला निर्णय?

साटम यांनी काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भंडिर्गे यांना पत्र लिहून आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. 

आपल्या पत्रात त्यांनी बीएमसीने सर्व आरोग्यविषयक खरेदीसाठी GeM पोर्टलचा वापर करावा. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येऊन जनतेच्या पैशांची बचत होईल आणि दर्जेदार साहित्याची खरेदी होईल, अशी मागणी केली होती.

Mumbai
बीएमसीचे वर्षाला वाचणार हजार कोटी! आमदार अमीत साटम यांनी काय केली सूचना?

पुढील काही वर्षांत बीएमसीकडून सुमारे 2,000 नवीन खाटांची क्षमता वाढवली जाणार असल्याने, त्या खाटांचा पूर्ण उपयोग होण्यासाठी वैद्यकीय तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच, सर्वसामान्य मुंबईकरांना माहिती मिळावी आणि कोणताही संभ्रम राहू नये यासाठी सर्व उपलब्ध सामान्य खाटा, आयसीयू खाटा आणि २४x७ सुविधा दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करावा, अशीही मागणी साटम यांनी केली.

GeM पोर्टलवर उपलब्ध असलेली सर्व औषधे आणि उपकरणांसह सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाईल. यामुळे पारदर्शकता निश्चित होऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे साटम यांनी सांगितले.

तसेच, बीएमसी रुग्णालयांमधील सर्व उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविणारा ऑनलाइन डॅशबोर्ड एक महिन्याच्या आत तयार केला जाईल. यामुळे मुंबईकरांना खाटांच्या उपलब्धतेची माहिती सहजपणे त्यांच्या हातात उपलब्ध होईल. तसेच ही माहिती मिळवण्यासाठी त्यांना इकडून तिकडे धावपळ करण्याची गरज भासणार नाही, असेही आमदार साटम यांनी सांगितले.

Tendernama
www.tendernama.com