BMC 'या' ठिकाणी उभारतेय 290 बेडचे हॉस्पिटल; 472 कोटींचे टेंडर...

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई पूर्व उपनगरातील नागरिकांच्या सोईसाठी कुर्ला-चांदिवली संघर्षनगर येथे मुंबई महापालिका (BMC) ४७२ कोटी खर्च करून २९० बेडचे रुग्णालय (Hospital) उभारणार आहे. महापालिकेने हे टेंडर (Tender) प्रसिद्ध केले असून, रुग्णालय उभारण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे.

BMC
डोंगर गायब झालाच कसा? महसूलमंत्री विखेंनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई पूर्व उपनगरातील पवई, घाटकोपर, चांदिवली परिसरातील नागरिकांना केईम, सायन, राजावाडी आदी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यामुळे या रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी नवे रुग्णालय उभारले जाणार आहे.

BMC
शिदेंची मोठी घोषणा; विदर्भाला 100 कोटींच्या 'या' प्रकल्पाचे गिफ्ट

वाढती लोकसंख्या रुग्णालयांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबई महापालिकेने नवीन रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व उपनगरात अद्ययावत रुग्णालय बांधण्यासाठी चांदिवली संघर्ष नगरमधील सीटीएस क्रमांक ११ ए-४ वर जनरल रुग्णालय बांधण्यात येणार आहे. १२ मजली रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे, माॅड्यूलर ऑपरेशन, स्टाफ क्वार्टर, रुग्णांसाठी सोयीसुविधा असणार आहेत. रुग्णालयीन स्टाफसाठी ३ विंग बांधण्यात येणार आहे. या इमारती अनुक्रमे १५, १९ आणि १७ मजली असणार आहेत. या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. कंत्राटदारास वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमारत बांधून रुग्णांच्या सेवेत आल्यापासून पुढील ८ वर्षे रुग्णालय इमारत व स्टाफ क्वार्टर इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे.

BMC
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; नाशिक सिव्हिलचे 'ते' टेंडर अखेर रद्द

नायर, केईएम, सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहेत. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात. यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चांदिवली संघर्ष नगर येथे अद्ययावत १२ मजली रुग्णालय उभारण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केले जाईल. यामुळे केईएम, नायर व सायन रुग्णालयावरील ताण कमी होईल, असा विश्वास आरोग्य विभागातील उच्चपदस्थांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com