BigNews: MPSCकडून मेगा भरतीची घोषणा; विक्रमी 8 हजार पदे, अर्ज करा

Job Alert
Job AlertTendernama

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजारपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

Job Alert
Nashik ZP : जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचांऐवजी...

राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वित्त, गृह, महसूल व वन आदी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी आज आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष निंबाळकर यांनी केले आहे.

या पदभरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या www.mpsc.gov.in, तसेच www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Job Alert
Nagpur: 4 महिन्यातच नव्या पुलावर खड्डे; गडकरी साहेब चौकशी कराच...

'या' विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती -

● सामान्य प्रशासन विभाग - सहायक कक्ष अधिकारी - ७० पदे

● महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी - ८ पदे

● वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे

● गृह विभाग- पोलिस उपनिरीक्षक – ३७४ पदे

● महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे

● गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे

● वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद

● वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे

● मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com