Air India: एअर इंडियाच्या तिकीट नोंदणीत मोठी घट; काय कारण आले समोर?

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या तिकीटांचे भाडेही १५ टक्क्यांपर्यंत घसरले
एअर इंडियाच्या विमानाला अपघात
Air IndiaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच्या भीषण अपघातानंतर (Air India Dreamliner crash in Ahmedabad) कंपनीच्या विमान तिकीटांच्या नोंदणीमध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवर सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे, तर सरासरी भाडे आठ ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे, असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष रवी गोसाई यांनी सांगितले.

एअर इंडियाच्या विमानाला अपघात
महाराष्ट्राला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 20,787 कोटी; भूसंपादनाला मिळणार गती

गेल्या आठवड्यात घडलेल्या अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर, आम्हाला एअर इंडियाकडील नोंदणीमध्ये तात्पुरती घट दिसून आली आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय क्षेत्रात. अर्थात, ही अल्पकालीन भावनिक प्रतिक्रिया आहे. कालांतराने आत्मविश्वास स्थिर होतो, गोसाई यांनी सांगितले. प्रमुख एअर इंडिया मार्गांवर भाड्यात मध्यम समायोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एअर इंडियाच्या विमानाला अपघात
छत्रपती संभाजीनगर, नागपूरचे ‘ते’ प्रकल्प सुसाट; 2 हजार कोटींच्या कर्जास शासनाची हमी

इंडिगो आणि अकासा यांसारख्या कमी किमतीच्या विमान कंपन्यांशी थेट स्पर्धा करणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांच्या तिकिटांच्या किमती सरासरी ८१२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मार्गांवर, विशेषतः युरोप आणि आग्नेय आशियातील, प्रवास भाड्यात १०१५ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर १५१८ टक्के नोंदणी रद्द करण्यात आली असून, देशांतर्गत ८१० टक्के वाढ झाली आहे.

येत्या काही दिवसांत स्थिती सामान्य होऊ शकते. कारण कोणतीही प्रणालीगत सुरक्षा समस्या नोंदवली गेलेली नाही आणि ‘डीजीसीए’सारख्या नियामकांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे एअर इंडिया पालन करत असल्याचे स्पष्ट केले आहे, असेही गोसाई यांनी नमूद केले.

एअर इंडियाच्या विमानाला अपघात
Mumbai : पश्चिम रेल्वे होणार हायटेक; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर 100 कोटी खर्च करणार

फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीचे सरचिटणीस राजीव मेहरा म्हणाले, एअर इंडियाच्या विमानांच्या नोंदणीमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, तर इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा जास्त असलेल्या काही क्षेत्रांमध्ये भाडे सुमारे १० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. एअर इंडियाच्या बाबतीत, काही क्षेत्रांमध्ये इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांसाठी भाडे सुमारे दहा टक्के स्वस्त आहे. याशिवाय, अपघातानंतर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअर इंडियाच्या विमानांच्या नव्या नोंदणीमध्ये १५-२० टक्क्यांनी घट झाली आहे.

प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व विमान कंपन्यांनी विमान देखभालीच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com