Badlapur : बदलापूर नगरपालिकेने 'त्या' ठेकेदाराविरोधात का दाखल केला गुन्हा?

Badlapur
BadlapurTendernama

मुंबई (Mumbai) : धूरफवारणी कामाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेत खुद्द ठेकेदारानेच (Contractor) अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करत कुळगांव बदलापूर नगरपरिषदेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात मे. शुभम महिला विकास मंडळ ठाणे या ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात (FIR) आला आहे.

Badlapur
Pune Nashik Expressway : असा असेल पुणे - नाशिक द्रुतगती प्रवास! पहा काय काय बदलणार?

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने डिसेंबर २०२० मध्ये शहरात डास प्रतिबंधक धूरफवारणी करण्यासाठी तीन वर्षांकरिता ई टेंडर मागविले होते. त्याप्रमाणे समर्थ पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस पालघर, मे. एव्हरग्रीन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कल्याण, मे. विघ्नहर पेस्ट कंट्रोल पुणे, मे. बेस्ट पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस नवी मुंबई, व मे. शुभम महिला विकास मंडळ ठाणे या कंपन्यांची टेंडर पात्र ठरली होती.

यातील शुभम महिला विकास मंडळ ठाणे यांना हा ठेका देण्यात आला. कारण या कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रात ठाणे महापालिकेचा तीन वर्षांचा धूरफवारणी अनुभव असलेला दाखला जोडला होता; मात्र यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी या संस्थेने सादर केलेला ठाणे महापालिकेचा अनुभवाचा दाखला हा बनावट असल्याचा आरोप केला.

Badlapur
Nashik : बाह्यरिंगरोडचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून अमान्य?

त्यानंतर याबाबत सखोल चौकशी या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याकडे अर्ज सादर करून केली. त्यानुसार प्राथमिक चौकशीत ठेकेदाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडून फेरतपासणी करण्यात आली.

या सगळ्या प्रकरणावर नगरपरिषदेकडे सुनावणी घेतली असता, संस्थेने टेंडरसोबत सादर केलेले धूरफवारणी अनुभव प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगरपरिषदेच्यावतीने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com