Ajit Pawar : शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाबाबत अजितदादांनी काय दिली गुड न्यूज?

Pune : अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : शिवाजीनगर बसस्थानकाची (Shivajinagar Bus Stand) पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

Mumbai
Devendra Fadnavis : सरकारचे पुणेकरांना मोठे गिफ्ट! पुण्यातील कोंडी फोडण्यासाठी 'असा' तयार करणार जमिनीखालून रस्ता

‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. तसेच ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी 99 वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai
सांगोल्यात उपसा सिंचन योजनेच्या तीनशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (ता.1 मे 2025) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत.

शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात ‘महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक त्या कार्यवाही पूर्ण कराव्यात.

शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानकाच्या विकासाचा प्रकल्पसुद्धा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, तो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

Mumbai
Pune : 'त्या' ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे),

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये...

          - आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.

          - वाहनतळासाठी दोन तळघर.

          - किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.

          - बसस्थानक तळमजल्यावर, बसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.

          - शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com