छत्रपती संभाजीनगरमधील 'हा' पुतळा करणार अनेक विक्रम

Sambhajinagar Municipal Corporation
Sambhajinagar Municipal CorporationTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : सिसोदिया घराण्यातील मेवाडचे राजपूत राजे महाराणा प्रतापसिंह यांचा छत्रपती संभाजीनगरातील पुतळा देशातील सर्वोच्च, तर महाराष्ट्रातील पहिला अश्वारूढ पुतळा ठरणार आहे.

यापूर्वी राजस्थानमधील घाटनी उदयपुरात १२ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. मुंबईत माझगावात १५ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पाठोपाठ अकरा वर्षांपूर्वी जळगावात १५ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र आता संभाजीनगरात तब्बल १६ फूट उंचीचा पुतळा देशात सर्वोच्च अश्वारूढ पुतळा मानला जाणार आहे.

पुतळा तयार झाला आहे. पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, त्याचे सिव्हील वर्क देखील अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यासाठी तब्बल दीड कोटीचे टेंडर काढले होते. यात पुतळ्यासाठी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर उर्वरित निधीतून‌ पुतळा‌ परिसराचे सुशोभीकरण व विद्युत रोषणाई, यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Sambhajinagar Municipal Corporation
स्मार्ट मीटर्सची टेंडर दुप्पटीने फुगवली; 'अदानीं'ना सर्वाधिक 14 हजार कोटींची टेंडर

महाराणा प्रतापसिंह यांचा संपूर्ण अश्वारूढ पुतळा ब्राँझ धातूत साकार करण्यात आल्याने त्यावर ब्लॅक ऑक्सिडाइंगमुळे वारंवार रंग देण्याची गरज भासणार नसल्याने महानगरपालिकेचा रंगरंगोटीचा खर्च देखील वाचणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रख्यात शिल्पकार निरंजन मडगलिकर, शिल्पा मडगलिकर, समीर मडगलिकर व त्यांचा सहाय्यक एस. एस. सुर्यवंशी व त्यांच्या टीमने ११ महिन्यात हा पुतळा तयार केला आहे. यासंदर्भात महानगरपालिका पुतळ्याच्या उद्घाटनाच्या तयारीला देखील लागली आहे.

छत्रपती संभाजीनगरासाठी साकारलेला महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा सिडको परिसरातील कॅनाॅट उद्यानात उभारण्यात येणार आहे.‌ हा पुतळा बनवायला ११ महिने लागले. आतापर्यंत शहरातील प्रख्यात शिल्पकार निरंजन मडगलिकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात सिध्दार्थ उद्यानातील गौतम बुद्ध, औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, शहागंज चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल, क्रांती चौक येथील शिवसृष्टी, जयभवानी नगरातील सिंहासनारूढ शिवछत्रपती शिवाजी महाराज, धूत हाॅस्पीटल समोरील अशोक स्तंभ व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आदी कामांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांचे मने जिंकले आहे. आता महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा ते साकार करत आहेत.

Sambhajinagar Municipal Corporation
Haldiram For Sale : असे काय झाले की 'हा' देशी ब्रँड विकण्याची वेळ आली?

काय आहे पुतळ्याचे वैशिष्ट्य

महाराणा प्रतापसिंह यांचा संपूर्ण अश्वारूढ पुतळा ब्राझ धातूत तयार केला आहे. पुतळ्याचे वजन साडेतीन टन इतके आहे. पुतळ्याची लांबी १६ फूट असून त्याला अनुसरून त्याची रूंदी आहे. जमिनीपासून पुतळ्याची उंची चबुतऱ्यासह ४१ फूट आहे. पुतळ्यासाठी एकूण ८७ लाख रुपये खर्च केला गेला आहे.

हा पुतळा देशातील इतर ठिकाणी असलेल्या पुतळ्यांपेक्षा सर्वाच्च उंचीचा पुतळा राहणार आहे. पुतळा परिसरासह उद्यानासाठी एक कोटी रुपये महानगरपालिका खर्च करत आहे. जमीन लेव्हलपासून चबुतऱ्यांची उंची २४ फूट आहे. चबुतऱ्यांची रुंदी ७ बाय १८ आहे. जमीन लेव्हल पासून चबुतऱ्यासह पुतळ्याची उंची ४१ फूट असणार आहे. कंत्राटदार तथा प्रख्यात शिल्पकार मडगलीकर यांनी कार्यारंभ आदेशात दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण केले हे विशेष.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com