पोलिस आले अन् सीएनजी पाइप लाइनचे काम झाले!

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : अखेर झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज रस्त्यालगत सीएनजी पाईप लाईनचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले. यासाठी चिकलठाणा पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांनी या प्रकरणात बारकाईने लक्ष घातले होते. जर महेश शिंदे या व्यक्तीने अडथळा आणला तर थेट अटक करून कायदेशीर कारवाईचे निर्देशही त्यांनी पोलिस निरिक्षक देविदास गात यांना दिले होते.

Aurangabad
मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला औरंगाबादेत सुरुंग

हे काम पूर्ण झाल्याने बीड बायपास सहारा सिटी ते शेंद्रा एमआयडीसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. आता केवळ पैठणरोडलगत नाथग्रुप समोरील नाल्यामुळे तसेच देवळाई चौक ते सहारा सिटी पर्यंत केवळ सहा किमी रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने थांबले आहे. येत्या पंधरा दिवसात हा संपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा भारत गॅस रिसोर्सेसच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पाईप लाईन टाकण्यास शिंदे नामक व्यक्तीचा मोठा अडथळा दूर झाल्याने शेंद्रा एमआयडीसी, तसेच मार्गावरील इंडियन ऑईल यंत्रणेमार्फत सीएनजी गॅस पुरवठा करण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचे देखील अधिकारी म्हणाले. आर्थिक लोभापायी पाईप लाईन टाकण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या शिंदेचा मुद्दा टेंडरनामाने समोर आणला होता.

बीडबायपास वळण मार्गाकडून झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज नाकाकडे येणाऱ्या मार्गावर हाॅटेल गुरुसायाचा मालक महेश शिंदे याने सीएनजी प्रकल्पांतर्गत पाईप लाईन टाकण्यास अडथळा निर्माण केला होता. यामुळे भारत गॅस रिसोर्सेसचे प्रकल्प प्रमुख बालाजी कायंदे व  केएसआयपीएलचे कंत्राटदार धनंजय गुगरकर यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली होती. विशेष म्हणजे लोक उपयुक्त या प्रकल्पाचे काम गत दोन महिन्यांपासून रखडले होते. अखेर या प्रकल्पांतर्गत काम पूर्ण झाल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सीएनजी गॅसची प्रतिक्षा करणाऱ्या सात लाख औरंगाबादकरांना दिलासा मिळाला. बुधवारी चिकलठाणा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात भारत गॅस रिसोर्सेस लि. कंपनीच्या अधिकारी व कंत्राटदाराने हे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण केले.

Aurangabad
मोठी बातमी! साताऱ्याहून पुण्यात येणाऱ्या मार्गात बदल; वाचा सविस्तर

मराठवाड्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प

मराठवाड्यातील रोजगार वाढीत सीएनजी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. औरंगाबाद  शहरात डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क) अंतर्गत घरोघरी गॅसपुरवठा करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने डेडलाईन दिलेली आहे. यासाठी केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे या कामावर विशेष लक्ष आहे. तसेच मराठवाड्यातील उद्योग, रोजगार वाढीसाठी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरणारी आहे.

अहमदनगर-औरंगाबाद या नोडमध्ये २ हजार कोटींतून होणाऱ्या ‘हर घर गॅस’ याेजनेचे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लोकार्पन करण्याचा निर्णय देखील केंद्रीय मंत्रालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सीएनजी नेटवर्कचे औरंगाबाद गेट वे ठरणार आहे. येथूनच विभागातील पुढील शहरांमध्ये गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्क विकसित करण्यात येणार असल्याने औरंगाबाद मराठवाड्याच्या विकासाचे प्रमुख अंग असणार आहे. अर्थातच उद्योग, रोजगार वाढीसाठी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरणारी आहे. 

Aurangabad
NASHIK: साधुग्राममधील जमीन भूसंपादनासाठी 3 हजार कोटी द्या!

हाॅटेल व्यावसायिकाला लालच सुटेना

औरंगाबादकरांच्या जीवनशैलीत सुधारणा करणाऱ्या या प्रकल्पाला हाॅटेल व्यावसायिक महेश शिंदे नामक व्यक्तीने बीपीसीएलचे सीएमडी अरुणकुमार जैन, योजनेचे प्रमुख श्रीपाद मांडके, प्रकल्प व्यवस्थापक बालाजी कायंदे व कंत्राटदार धनंजय गुगरकर यांना राजकीय दबाब निर्माण करत, तर कधी माझी जमीन असल्याचा दावा करत कधी कोर्टाचा स्थगिती आदेश असल्याचे भासवत नाकीनऊ करून सोडले होते. अखेर टेंडरनामाच्या वृत्तमालिकेने याप्रकरणाला वाचा फुटली, संबंधित यंत्रणा जागा झाल्या आणि दोन महिन्यापासून थांबलेले काम काही तासात पूर्ण झाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com