सिडकोतील सावरकर नगरकरांना कोणी वालीच नाही?

सिडकोतील सावरकर नगरकरांना कोणी वालीच नाही?

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रस्त्यांची चाळणी, वाहनांचा खुळखुळा, हाडांचा खिळखिळा अशा धोकादायक रस्त्यावरून प्रवास; मात्र सिडकोतील सावरकर नगरकरांसाठी एकही 'माई का लाल' महापालिकेला जाब विचारण्यासाठी पुढे येत  नाही हे येथील उच्चभ्रू लोकांचे दुर्देवच म्हणावे लागेल.

सिडकोतील सावरकर नगरकरांना कोणी वालीच नाही?
Vijaykumar Gavit: आदिवासी विभागात 2 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे

सतरा वर्षांपासून चाळणी झालेल्या सिडको एन - ५ सावरकर नगरातील रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या पाठीचे मणके खिळखिळे केले. अनेकांना दुर्धर आजार जडले तर काहींना अपघातामुळे जखमी व्हावे लागले आहेत. वाहनांचा खुळखुळा झाला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या खड्ड्यातून मार्ग काढताना काैशल्य पणाला लावणाऱ्यांमध्ये शहरातील साहित्यिक, डाॅक्टर, वकील, व्यापारी, पत्रकार, प्राध्यापक आणि सेवा निवृत्त न्यायाधीश या प्रतिष्ठांचा समावेश आहे.

या रस्त्यावरून जाताना गाडीचे काच लावून घेणे, पर्यायी रस्ता शाेधणे, खड्डा चुकवणे, यासारखे पर्याय शाेधणाऱ्या पांढरपेशांनी गेल्या सतरा वर्षांत खड्ड्यांबाबत महापालिकेकडे वारंवार  तक्रारीचा पाऊस पाडला. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत साधे डांबर देखील शिंपडले नाही.  प्रतिष्ठितांनी सहनशीलतेचा कळस गाठला असताना कोट्यवधीचा महसूल जमा करणाऱ्या  महापालिकेने रस्ते दुरुस्तीची काळजी घेतली नाही.

सिडकोतील सावरकर नगरकरांना कोणी वालीच नाही?
106 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांत स्पर्धा

अवकाळी पावसाने तर येथील रस्त्यांची पार चिखलवाट झाली आहे. निदान पावसाळ्यापुर्वी तरी येथील रस्त्यांची डागडुजी सुरू करणे अपेक्षित आहे. सावरकर नगरातील रस्त्याची डोकेदुखी कायमस्वरुपी संपण्यासाठी आमदार-खासदार, पालकमंत्री, प्रतिष्ठित नागरिक महापालिकेला सवाल करण्यासाठी पुढाकार घेतील काय, हा खरा सवाल आहे.

अनेक प्रतिष्ठित दैनंदिन कामासाठी सावरकर नगरातील रस्त्यांचा वापर करतात. या रस्त्यांच्या अवस्थेबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही काही एक उपयोग होत नाही. सध्या हे संपूर्ण रस्ते उखडले गेल्याने नवीन रस्ते तयार करण्याची गरज आहे. मात्र, नागरिकांची सहनशीलता बघता महापालिकेतील कारभाऱ्यांना निदान खड्डे बुजवायला देखील सवड मिळत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com