Sambhajinagar : स्मार्ट सिटीतील नागरिकांना का प्यावे लागतेय दूषित पाणी? संभाजी कॉलनीतील धक्कादायक वास्तव

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-६ परिसरात जुन्या झालेल्या ड्रेनेजलाइन ओसंडून वाहत आहेत. ड्रेनेजलाइन चोकअप झाल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये मिसळून नळाला दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Sambhajinagar
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे : मार्ग बदलल्याने भूसंपादन केलेल्या 45 हेक्टर जमिनीचे करायचे काय?

महानगरपालिका ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी ओरड केल्यावर महानगरपालिका प्रशासन कारवाई करण्याचा देखावा करते. मात्र समस्या कायम आहे. त्यामुळे गत तीस ते चाळीस वर्षांपासून सिडकोच्या काळातील जुनाट ड्रेनेजलाइन बदलण्यात यावी, अशी मागणी सिडको एन - सहा परिसरात जोर धरू लागली आहे. 

Sambhajinagar
'टेंडरनामा'च्या तपासात फुटले 'त्या' अधिकाऱ्यांचे बिंग! टेंडर विनाच दिले 10 लाखांचे काम

वारंवार चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची केवळ तात्पुरती स्वच्छता करून महानगरपालिका धन्यता मानत आहे. परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. त्यामुळे ड्रेनेजची समस्या तर निर्माण झालीच आहे, शिवाय नळावाटे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ड्रेनेजलाईन व पाण्याची पाइपलाइन बदलून दूषित पाण्यापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी मनीष नरवडे व नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com