Sambhajinagar : संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज! अखेर 'त्या' रस्त्याला मिळाला ठेकेदार‌; 140 कोटीतून रस्ता होणार सुसाट

Highway
HighwayTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नगरनाका - दौलताबाद टी पाॅइंट महामार्गाच्या चौपदरीकरण कामास काही महिन्यांत सुरुवात होणार आहे.‌ कारण या रस्त्याला ठेकेदार मिळाला आहे.

मुंबईतील जे. पी. इंटरप्रायझेस या ठेकदाराला हे काम मिळाले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये या महत्वाच्या रस्त्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. यात छत्रपती संभाजीनगर येथील ए. जी. कन्सट्रक्शन कंपनीने दहा टक्के जास्त दराने टेंडर भरले होते. तर मुंबईच्या जे. पी. इंटरप्रायझेस कंपनीने दोन टक्के कमी दराने टेंडर प्रक्रियेत सहभाग नोंदवल्याने छाननी अंती जे. पी. इंटरप्रायझेस कंपनीला हे काम देण्यात आल्याचे सुत्रांकडून कळाले.

Highway
Impact : जालन्यातील कंडारी ते टेंभी रस्त्याच्या चौकशीसाठी नेमला चौकशी अधिकारी

नगरनाका ते दौलताबाद हा रस्ता चारपदरी सिमेंटचा करण्यात येणार असून, दोन पदरी जोड रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टेंडरनामाशी बोलताना दिली. लवकरच या  रस्त्याचे काम सुरू केले जाणार असल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. विशेषत: रस्त्याच्या मधोमध दुभाजकात एलईडी दिवे लावले जाणार असल्याने रस्ता लख्ख प्रकाशदिव्यांनी चमकणार आहे.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ही तीन राज्ये व मराठवाडा, विदर्भ व खान्देश या तीन प्रांतांना जोडणाऱ्या सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाऱ्या नगरनाका ते दौलताबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासूनची मागणी सरकारने मान्य  केल्याने या भागाला न्याय मिळाला आहे.

मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर व वेरूळ लेणी, पुढे दौलताबाद किल्ला, सुलीभंजन तसेच म्हैसमाळ व गवताळा अभयआरण्य तसेच चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेले कालीमातेचे मंदिर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्यातील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत आहे. कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक मंदिर याच मार्गावर असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. 

Highway
Atal Setu : बापरे! अवघ्या 3 महिन्यांत अटल सेतूला भेगा, रस्ता फूटभर खचला; कारण काय?

नगरनाका ते दौलताबाद टी पाॅइंट अरुंद रस्त्यामुळे अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे होते. रस्त्याच्या कामासाठी काही दिवसांपूर्वीच टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. चारपदरी सिमेंट रस्ता व दोन पदरी डांबरी रस्त्याला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता हा दहा किलोमीटरचा रस्ता सुसाट होणार आहे. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटणार आहे. 

आमदार शिरसाट यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर चौपदरी करणाच्या प्रस्तावाला वेग येऊन त्यास मंजुरी देऊन टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते.‌ नगरनाका ते दौलताबाद टी पाॅईंटपर्यंत १८ मीटर सिमेंट रस्ता व दोन्ही बाजुंना दोन मीटरचा डांबरी रस्ता व मध्यभागी दोन मीटरचा दुभाजक व त्यावर सुशोभीकरण व पथदिवे लावले जाणार आहेत. या रस्त्याच्या बांधकामासह भूसंपादन व रस्त्यातील विद्युत खांब व डीपी हटविने आदी कामांसाठी तब्बल दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४० कोटीत रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com