Sambhajinagar : 7 महिन्यांतच उखडला साडेसात कोटींचा सिमेंट रस्ता; तरीही यंत्रणा कंत्राटदाराच्याच पाठीशी

Scam
ScamTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) निधीतून तालुक्यातील आपतगाव - पिंप्रीराजा सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे यामुळे कंत्राटदार व अधिकाऱ्यांत हातमिळवणी असल्याचा आरोप केला जात आहे. 

Scam
स्मार्ट मीटर्सची टेंडर दुप्पटीने फुगवली; 'अदानीं'ना सर्वाधिक 14 हजार कोटींची टेंडर

आपतगाव ते पिंप्रीराजा येथील पाच ते सहा किलोमीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अर्थात सात महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी निकृष्ट दजार्चे काम होत असल्याबाबत कंत्राटदाराला सांगितले, मात्र याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष करीत काम पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम डीपीडीतून जवळपास साडेसात कोटी रुपये खर्चून करण्यात आले.

या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला होता. तर या कामात दोष आढळल्यास १२ महिन्यांच्या आत दोष निवारण करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र दोन महिन्यांतच या रस्त्यावर भेगा पडलेल्या आहे. रस्त्यावरचे सिमेंट उखडले असल्याने गिट्टी उघडी पडली आहे. शिवाय रस्त्याच्या कडा खचल्याने रस्त्याचे काम दजार्हीन झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

Scam
Haldiram For Sale : असे काय झाले की 'हा' देशी ब्रँड विकण्याची वेळ आली?

टेंडरनामाने रस्त्याची पाहणी केली असता येथील रस्त्यावर जिथून कामाला सुरवात झाली व जिथे काम संपले त्या ठिकाणी टेंडरच्या अटीशर्तीनुसार कामाची माहिती देणारा फलक लावणे गरजेचे असताना फलक लावलेला नाही. यामुळे सदर कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला जात आहे.

या सिमेंट रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली असून हा रस्ता सिमेंटीकरण केला अथवा खडीकरण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या संदर्भात ९ ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार केली; मात्र यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com