Good News : छत्रपती संभाजीनगरात 24 एकरांवर Central Park; जी. श्रीकांत यांनी यंत्रणा लावली कामाला

Central Park New York
Central Park New YorkTendernama

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या (Central Park New York) धर्तीवर हडकोतील एन - १२ येथील मजनुहील परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात २४ एकर जागेवर सेंट्रल पार्क (Central Park At Chhatrapati Sambhajinagar) आणि दुबई (Dubai), तसेच गुजरातेतील (Gujrat) स्टेच्यू ऑफ युनिटी (Statue Of Unity) जवळ असलेल्या ग्लो गार्डनच्या (Glow Garden) धर्तीवर ग्लो गार्डन साकार होणार आहे.

Central Park New York
Pune Bengaluru Expressway News : पुणे-बंगळूर सुसाट; 50 हजार कोटींच्या द्रुतगती महामार्गाचे काम सुरू

टीव्ही सेंटर व्यापारी संकुल ते स्वामी विवेकानंद तसेच रोजगार्डन पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या २४ एकर जागेवर शहरात पहिल्यांदाच महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत, शहर अभियंता अविनाश देशमुख, मुख्य उद्यान अधिकारी डाॅ. विजय दहीहंडे ( पाटील )यांच्या संकल्पनेतून सेंट्रल पार्कचा भव्य प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. तब्बल २४ एकर जागेवर तयार होणाऱ्या या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शहरातीलच बिल्डर्स असोसिएशनला येथील उद्यानाच्या जागेवर विकास आराखडा व सेंट्रल पार्कसाठी तरतूद करून मंजुरीही देण्यात आली आहे.

त्यामुळे गुजरात मधील स्टेच्यू ऑफ युनिटी ग्लो गार्डन, तसेच दुबईतील ग्लो गार्डन व न्यू याॅर्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क, पेटपार्क अर्थात कुत्र्यांसाठी आरक्षित उद्यान शहरातील नागरिकांना विविध प्रजातीतील कुत्रे घेऊन येण्यास या स्वतंत्र आरक्षित उद्यानात मुभा राहिल.‌

सोबतच ॲडव्हेंचर पार्क तयार करण्यात येणार आहे यात रोपवे, रोप सायकल, झिफलाईन या व्यतिरिक्त अनेक साहसी खेळांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

यासाठी भव्य खेळाचे मैदान विकसित केले जाणार आहे. या ठिकाणी शहरातील मुलांसाठी संपूर्ण उद्यान परिसरात आकर्षक खेळण्या उभारण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल, शहरवासीयांना विरंगुळा आणि मनोरंजनाची हक्काची जागा उपलब्ध होईल, हा यामागे उद्देश असल्याचे शहर अभियंता अविनाश देशमुख यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

Central Park New York
Mumbai Ahmedabad Bullet Train News : समुद्राखाली तयार होतोय बोगदा; काम युद्धपातळीवर सुरू

फाउंटन, धबधबे , जलमार्ग, हिरवीगार लाॅन, विविध प्रजातीच्या फुलांचे ताटवे, विद्युत रोषणाई, सुशोभीकरण, पाण्याची व्यवस्था, इंटरनॅशनल स्वच्छतागृहे, खाऊगल्ली, सुशोभित रस्ते आणि जेट्टीसह अत्याधुनिक सुविधा असणारे हे भव्य उद्यान हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर येथे खोलगट भागात भराव टाकून उद्यान साकार होणार आहे.

हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबाबत शहरातील बिल्डर्स असोसिएशनला उद्यानासाठी लागणारे बजेट, तसेच त्याचे संकल्प चित्रासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना आचारसंहितेपूर्वी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

बिल्डर्स असोसिएशनच्या अहवालानंतर त्याचे मूल्यमापन व अहवालाचा अभ्यास करून अंमलबजावणी करणे आणि टेंडरचा मसुदा तयार करण्यासाठी त्यातूनच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अविनाश देशमुख यांनी सांगितले.

यानंतर या भव्यदिव्य प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या उद्यानासाठी नेमण्यात येणाऱ्या सल्लागाराला विस्तृत प्रकल्प अहवाल व प्रकल्पाचा वास्तविकता अहवाल सादर करावा लागणार आहे. याशिवाय संबंधित संस्थेला टेंडर मसुदाही तयार करावा लागेल.

Central Park New York
Nashik : एमआयडीसीने इंडियाबुल्सकडून 512 हेक्टर जमीन परत घेतली; मात्र कंपनीची न्यायालयात धाव

या कामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या, परवाने मिळविण्यासाठी मदत करणे, प्रकल्पाच्या विकासासाठी पर्याय सुचवणे आणि थ्रीडी इमेज तयार करणे अशी कामे करावी लागणार आहेत. या प्रकल्पाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारीही सल्लागाराची असणार आहे. वाहतुकीचे नियोजन, सुरक्षेला प्राधान्यही जागा विकसित झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण होणार आहे. त्यामुळे या जागेवरील वाहतूक व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापनासह महत्त्वपूर्ण असणाऱ्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

याबाबत सल्लागाराला अभ्यास करून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेला अहवाल सादर करावा लागेल. याशिवाय ई-टेंडर, वास्तुशास्त्रीय आराखडे, देयकांबाबतही नियोजन सल्लागाराला सूचवावे लागेल.

Central Park New York
Konkan Costal Highway News : मुंबई ते सिंधुदुर्ग सुसाट; कोकणातील 'त्या' 2 खाडीपुलांसाठी दिग्गज कंपन्यांमध्ये स्पर्धा

या प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर

सद्यस्थितीत उद्यानात एका खाजगी एजन्सी मार्फत बीओटी तत्वावर मुले व नागरिकांसाठी पर्यावरणपूरक, बॅटरी, विद्युत उर्जेवर चालणारी धूर रहित बुलेट ट्रेनच्या आकाराची मिनी ट्रेन उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. सदर कामासाठी पैठण येथील विश्वा मल्टी सर्व्हिसेस यांची नियुक्ती केली आहे.

मिनी ट्रेन प्रकल्पातून होणाऱ्या उत्पन्नातून २५ टक्के राॅयल्टी महापालिका प्रशासनाला मिळणार आहे. मिनी ट्रेन कार्यान्वित झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना मनोरंजनाच्या सोईत भर पडणार आहे. मिनी ट्रेन निर्मिती करणाऱ्या ठाण्यातील अरिहंत इंटरप्रायझेसकडून खरेदी करण्यात आली आहे.

चार बोगीच्या मिनीट्रेनमध्ये ६० लोकांची आसन व्यवस्था केली आहे. मिनी ट्रेनसाठी चारशे मीटरचा ट्रक तयार केला आहे. यासाठी दोन ठिकाणी तिकीटघरांची व्यवस्था व लोकांसाठी भव्य आसन व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा साजरा केला जाणार आहे. बीओटी तत्त्वावर होत असलेल्या या प्रकल्पासाठी साधारणतः दोन कोटी रुपये खर्च केला जात आहे.

यापूर्वी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सिध्दार्थ उद्यान व बाॅटनिकल उद्यानात कित्येक वर्षापासून बंद पडलेल्या मिनी ट्रेन सुरू केल्या. विशेषतः नेहरू उद्यानात बोटींग सुरू केली. सिडकोसह शहरातील सिध्दार्थ उद्यानाचा चेहरामोहरा बदलला. आता सेंट्रल पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल, शहराच्या सौंदर्यात भर पडेल. पर्यटनात वृध्दी वाढेल. सोबतच विकास कामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत भर देखील पडेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com