TDR
TDR Tendernama
टेंडरिंग

ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्‌स (TDR) म्हणजे नक्की काय?

टेंडरनामा ब्युरो

जमिनीच्या मालकाला आरक्षणासाठी त्याची जमीन अधिग्रहित करण्याच्या मोबदल्यात तेवढा चौरस फूट ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्‌स (TDR) दिला जातो. ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्‌स म्हणजे विकास हक्क हस्तांतर होय.

ही किचकट असलेली तांत्रिक व्याख्या वाचल्यानंतरही टीडीआर म्हणजे नक्की काय, असा अनेकांचा प्रश्न उतरोच. त्यामुळे टीडीआर म्हणजे काय हे, आणि त्याचा वापर कसा केला जातो, हे आपण समजून घेऊ.

एखाद्या शहराची स्थानिक प्रशासकीय संस्था, नवी मुंबईचा विचार केल्यास नवी मुंबई महानगरपालिका शहराची विकास योजना (DP) तयार करते. त्यात उद्याने, शाळा, रस्ते, बस स्थानक व इतरही अनेक गोष्टींसाठी तरतुदी करते.

अर्थातच या जमिनी बाजारभावाने खरेदी करायच्या झाल्या तर नवी मुंबई महानगरपालिकेकडे वर नमूद केलेल्या व इतरही अनेक सुविधा प्रत्यक्ष बांधण्यासाठी पैसेच उरणार नाहीत. म्हणूनच महानगरपालिका अशा जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 'टीडीआर' देते.

ते हा टीडीआर बाजारात विकू शकतात. तसेच बांधकाम व्यवसायिक या टीडीआरचा वापर त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये करू शकतात, जेथे जमीन निवासाच्या हेतूने राखून ठेवण्यात आली आहे. टीडीआर हा चौरस फुटांमध्ये मोजला जातो.

असा वापरला जातो टीडीआर...

1) ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्‌स (TDR) म्हणजे काय हस्तांतर विकास हक्क

2) तो कशाच्या मोबदल्यात मिळतो?

- विकास आराखड्यात पायाभूत सुविधांसाठी खासगी जागांवर विविध प्रकाराची आरक्षणे टाकली जातात. त्या आरक्षणाच्या जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून जागा मालकाला रोख रक्कम अथवा टीडीआरच्या स्वरूपात मोबदला दिला जातो.

३) टीडीआर कुठे वापरता येतो?

- महापालिका हद्दीतील मंजूर विकास आराखड्यातील बांधकाम योग्य क्षेत्रावर मान्य एफएसआय व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी याचा वापर करता येतो.