Project Expenditure
Project Expenditure Sakal
टेंडरिंग

प्रकल्प खर्चात वाढ कशी होते?

टेंडरनामा ब्युरो

प्रकल्प उभारणी किंवा कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत विविध बाबींचा समावेश असतो; ज्यात प्रामुख्याने कामगार, कच्चा माल (raw material), माशिनरीस (JCB, Poclain), इंधन, विद्युत अपघात विमा कामगारांचे ‘ईएसआय’, भविष्यनिर्वाह निधी, शासकीय कर आधी कामगारांच्या विमान वेतनातील दर वर्षांतील वाढ, विशषत: वर्षाकाठी किमान ५ ते ८% वाढ, तसेच कच्चा मालाच्या दरामध्ये देखील दर वर्षी ५ ते ६% वाढ या बाबी गृहीत धरण्यात येतात. त्याशिवाय, प्रत्यक्ष कामातील यंत्रण, त्याची वाहतूक, इंधनाचा खर्चही महत्त्वाचा असल्याने त्या बाबींची प्रकल्प खर्चाचा घटक ठरतात. यासाठी महागच्यईा प्रमाणात दरवाढ होत असते.

विविध कारणांमुळे प्रकल्प खर्च मध्ये वाढ होत असते. तसेच प्रत्यक्ष प्रकल्प राबवितांना काही अडचणी आढळून आल्यास किंवा तांत्रिक दृष्ट्या प्रत्यक्ष काम करतांना पूर्वगणनपत्रकापेक्षा सुधार करणे आवश्यक असल्यास प्रकल्प खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम हा प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणेवर आर्थिक ताण येतो. काही वेळा वाढलेला खर्च कोणी आणि कोठून आणायचा ? याचाही तिडा निर्माण होतो. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. प्रकल्प मुदतीत पूर्ण होत नाही. ठेकेदार कंपनीला वाढीव खर्च देण्यासा टाळाटाळ केल्यास काम बंद करण्याची तयारी ठेकेदार करतात. काही वेळा, ठेकेदारांकडील अपुऱ्या यंत्रणांमुळे काम अपेक्षित वेगाने होत नाही. त्यामुळे त्याचे काम काढून अन्य ठेकेदाराला नेमतानाही खर्चात वाढ करावीच लागते.

प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ?

प्रकल्पांची किमती ही त्याच्या अंमलबजावणीच्या मुदतीवर म्हणजे, प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधनुसार ठरविली जाते. त्यामुळे निविदेतील अटीनुसार ठराविक कालावधीतच प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असते. त्याशिवाय, लोकांना चांगली सेवाही मिळून, शहराच्या विकासाच्या प्रक्रियेला गती येते.