Narendra Modi, Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

PM मोदींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय दिले बर्थडे गिफ्ट?

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये ‘नमो’ उद्यान, प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नविन नगरपंचायत, नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ (Namo Udyan) नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे देखील देण्याचा निर्णय शिंदे यांनी जाहीर केला आहे.

नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषीक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर करण्यात येतील. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये अशी बक्षिसाची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे.