Olectra
Olectra  Tendernama
टेंडर न्यूज

'ऑलेक्ट्रा'ला ३०० ई-बसचे ५०० कोटींचे टेंडर; पाहा कोणी दिले?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बेस्टच्या २१०० ई-बसेस आणि एसटी महामंडळाकडून १०० ई-बसेसचे कंत्राट मिळवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला 300 ई बसेसचा पुरवठा करण्यासाठी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाकडून (TSRTC) नवे टेंडर मिळाले आहे. सुमारे 500 कोटींचे हे टेंडर आहे.

भारत सरकारच्या फेम-२ (FAME-II) योजनेअंतर्गत 300 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे हे कंत्राट आहे. या 300 ई-बस 12 वर्षांसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट GCC)/ ऑपेक्स (Opex) मॉडेलद्वारे पुरवल्या जातील. ईव्हे (Evey Trans Private Limited (EVEY) या बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून (OLECTRA) खरेदी करेल, 20 महिन्यांच्या कालावधीत त्या वितरित केल्या जातील. कराराच्या कालावधीत ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल करणार आहे.

सध्या, ईव्हे आणि ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड देशातील विविध राज्य परिवहन उपक्रमाअंतर्गत (STU) इलेक्ट्रिक बस चालवत आहेत, पुणे (PMPML), मुंबई (BEST), गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर इत्यादी ठिकाणी या बसेस कार्यरत आहेत. या 12-मीटर, एकमजली नॉन-एसी बसेसची आसन क्षमता 35+ व्हील चेअर आणि चालक अशी आहे. या बसमध्ये इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक आसनासाठी एक आपत्कालीन बटण आणि यूएसबी सॉकेट्स आहेत. बसमधील लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी रहदारी आणि प्रवासी लोड यावर एका चार्जवर सुमारे 200 किमी प्रवास करू शकते. रिजनरेटिव्ह ब्रेकींग सिस्टम या बसमध्ये आहे. तसेच हाय-पॉवर डीसी चार्जिंग सिस्टम 5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण बॅटरी चार्ज करते.