Aditya Thackeray
Aditya Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Aditya Thackeray : रेसकोर्सच्या जमिनीचे विभाजन नको अन् बांधकामही नकोच!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचा वाद चांगलाच रंगला आहे. रेसकोर्स येथे ३२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मात्र रेसकोर्स २२६ एकरवर आहे. ३२० एकरवर नाही असे स्पष्ट करून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत किवा त्यांना माहित नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, रेसकोर्स आजही सर्वांसाठी खुले आहे. जर त्याला सेंट्रल पार्क बनवायचे असेल तर येथील आरडब्ल्यूआयटीसी काढू शकता. परंतु जमिनीचे विभाजन किंवा तेथे कोणतेही बांधकाम केले जावू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

भूमिगत कार पार्क म्हणजे चार वर्षे खोदणे आणि धूळ याचा प्रादुर्भाव होणारच, शिवाय, आम्हाला भूमिगत कार पार्कची आवश्यकता नाही. आम्ही नियोजन केलेले आणि अंमलात आणलेल्या कोस्टल रोडमध्ये आधीच भूमिगत कार पार्किंग आहे असे स्पष्ट करतानाच हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांना मदत करण्यासाठी चालले असल्याचा टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्रांना मदत करण्यासाठी, रेसकोर्स जवळ असलेल्या एसआरएच्या काही घरांसाठी “विनामूल्य अतिरिक्त एफएसआय” देण्याची योजना त्यांनी आखली असल्याची टीका करतानाच हा सर्व खर्च मुंबईकर  करदात्यांच्या पैशातून असेल असेही त्यांनी म्हटले आहे.