Job
Job Tendernama
टेंडर न्यूज

'या' क्षेत्रात नोकरी स्वीच करा अन् पगारात मिळवा 150 टक्क्यांची वाढ

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दोन वर्षानंतर आयटीमध्ये (Information Technology) नव्या प्रकल्पांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रात 'बूम' आल्याने सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे कौशल्य असलेल्या फ्रेशर्सलाही सोन्याचे दिवस आले आहेत. आयटी क्षेत्रात तरुणांच्या नोकऱ्या स्वीच करण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी वाढलेले आहे.
मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये लाखोंचे पॅकेज देत आहेत. तसेत अनुभवी नोकरदार नवीन कंपन्यांमध्ये रुजू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पगारातही विक्रमी वाढ होऊ लागलेली आहे.

सध्या माहिती तंत्रज्ञानमध्ये (आयटी) आरोग्य क्षेत्रासहीत शेकडो अपग्रेडेड प्रोजेक्टची डिमांड अचानकच वाढली आहे. नागपूर शहरातील आयटी पार्कसह मिहानमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. येथील आयटी कंपन्यांमध्ये स्किल्ड मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांमध्ये मनुष्यबळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. मनुष्यबळ टिकविण्यासाठी विविध कंपन्यांची धडपड सुरू आहे. बऱ्याच कंपन्यांनी बिझनेस बूम झाल्यानंतर विविध जिल्हे व राज्यांमधून मिळेल तसे आयटीयन्सला वर्क फ्रॉम होमच्या माध्यमांतून कामावर रुजू करून घेतले आहे.

बड्या कंपन्या प्रोजेक्ट ब्रेक होवू नये, यासाठी बॅकअप टीम शोधू लागल्या आहेत. ऐनवेळी तज्ज्ञ कर्मचारी काम सोडत असल्याने कमी पगारावरील फ्रेशर्स किंवा कमीत-कमी अनुभवी आयटीयन्सची नियुक्ती करण्याचा फंडा प्रोजेक्टसाठी वापरला जात आहे. तसेच, सर्व सॉफ्टवेअर भाषांमधील काम प्रत्येक कर्मचाऱ्याला शिकवले जात आहे. अशा विविध क्लृप्त्या सध्या बड्या कंपन्यांमध्ये वापरल्या जात आहेत.

२००५ पूर्वी आयटीमधील नोकऱ्यांमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेचे प्रमाण हे १० टक्के होते. त्यानंतर, ते किंचीत वाढले. कोरोना काळात हे प्रमाण ३० टक्क्यांवर गेले. क्षेत्रात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे, तरुणांच्या पॅकेजमध्ये तब्बल १५० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.