Aurangabad
Tendernama
औरंगाबाद (Aurangabad) : रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार चाळीस कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या रूळाखाली होत असलेल्या इतर भुयारी मार्गामुळे पाणी लांबणीवर पडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे भुयारी मार्गासाठी केलेल्या काॅक्रीट ब्लाॅकमध्येच वडपिंपळाची झाडी उगवल्याने ते असुरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकडे मात्र रेल्वेशप्रशासन आणि कंत्राटदाराचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
चिकलठाणा रेल्वे स्थानक परिसरातून बकालवाडीसह अन्य पाच ते सहा कॉलनी तसेच जालनारोड ते बीडबायपासकडे जुन्या बीडबायपासकडून जाण्यासाठी रेल्वे रूळांची अडचण येत आहे. रेल्वेची संख्या वाढल्याने सरासरी २४ तासात ३६ वेळा रेल्वेगेट बंद होत असून, यात प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचा यात समावेश आहे. रेल्वेने येथे भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार ४० कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या रेल्वे रूळाखालुन अर्थात बदनापुर ते चिकलठाणा रेल्वे गेट क्रमांक ५७ दरम्यान झाल्टा रेल्वेगेट क्रमांक ५८, कुंभेफळ रेल्वेगेट क्रमांक ५९ आणि करमाड रेल्वेगेट क्रमांक ६० येथेही भुयारी मार्गाचे काम एकाच वेळी काढल्याने चिकलठाणा रेल्वे गेट क्रमांक ५७ येथील काम लांबणीवर पडले आहे.
चिकलठाणा रेल्वेस्थानकजवळील हा प्रश्न आहे. दिवसेंदिवस औरंगाबाद शहराचा विकास चौफर झाल्याने रेल्वे स्थानकाच्या समोरील भागातील अनेक नवीन कॉलन्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे त्या भागातील पाच ते दहा हजार नागरिकांना औरंगाबाद शहरात येतांना आणि पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील जुना रस्ता महत्वाचा आहे. परंतु गेल्याा काही वर्षात रेल्वेची ये-जा वाढल्याने दर एक ते अर्धा तासांनी रेल्वे गेट बंद होत आहे. याचा मोठा परिणाम या भागातील वाहतूक ठप्प होण्यावर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून त्या भागातील नगरसेवक तसेच रेल्वे संघर्ष समिती आणि नागरिकांनी रेल्वेसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भुयारी मार्ग मार्गी लावण्याची मागणी केली होती.या मागणीवर बराच खल होऊन निवडणूकीपूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी जिल्हाधिका-यांच्या दालनात रेल्वेतील अधिका-यांना बोलावून बैठक घेतली होती. त्यानंतर येथील भुयारी मार्गाचा प्रश्न निकाली लागला.
त्यानंतर नांदेड विभागीय व्यवस्थापकाच्या पहाणीनंतर दमरेने (दक्षिण मध्य रेल्वे)कडून केंद्रिय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. सन २०२० - २१ मध्ये त्याला मंजुरी मिळाली. तब्बल ४० कोटी रूपये मंजुर झाल्यानंतर याकामाचे टेंडर काढण्यात आले. गतवर्षी येथे ९ आरसीसी ब्लाॅक तयार करण्याचे काम कंत्राटदाराने युध्दपातळीवर सुरू केले. परंतु त्यानंतर हे काम लांबणीवर पडले आहे.
ब्लाॅकमधून काढले वडपिंपळाने डोके वर
कंत्राटदाराने रेल्वेरूळाच्या काही अंतरावर दोन्ही बाजुने ब्लाॅक तयार करून ठेवले. यात या भागातील शेतकर्यांना येण्याजाण्यास अडचन निर्माण केली आहे.गत वर्षभरापासून कंत्राटदाराने त्याकडे ढुकुनही पाहिले नाही. परिणामी या नव्याकोऱ्या ब्लाॅकमध्ये वड पिंपळ आणि इतर रानटी गवत उगवल्याने ते असुरक्षिततेची घंटा वाजवत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाने व संबंधित कंत्राटदाराने वेळीच गंभीरतेने लक्ष न दिल्यास हे नवे कोरे ब्लाॅक भुयारी मार्गासाठी अडचणीचे ठरतील. अशी शक्यता या भागातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.