Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

फडणवीस, गडकरींचे नागपूर बनणार देशातील सर्वांत सुंदर शहर!

Chandrashekhar Bawankule: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur): रोज नवनवीन जेथे आकाराला येते ते म्हणजे नागपूर अशी नवी ओळख आपली निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नातून हे महानगर या देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून लवकरच ओळखल्या जाईल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरातील मोठ्या प्रमाणात ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत त्याच कटिबध्दतेने येथील लहान-लहान वस्त्यांमध्ये जी महत्वाची कामे आहेत ती सर्व प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी 317 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

नझूल जमिनीवर ज्यांची घरे आहेत ती नियमानुसार कायदेशिर करून एक लाखापेक्षा अधिक लोकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. झुडपी जंगल क्षेत्रात जे गोरगरिब अनेक वर्षांपासून राहत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण न्याय देत आहोत. या महानगरात भूयारी गटार योजनेचा नवा डिपीआर आपण तयार करीत आहोत. तो लवकरच मार्गी लागेल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

कोराडी रोडकडून भोसला मिलट्री टीपाईंटवर उड्डाणपुलाची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली. ही मागणी त्यांनी मान्य करुन तशी घोषणा केली.