Petrol
Petrol Tendernama
टेंडर न्यूज

पेट्रोल-डिझेल भरुनच ठेवा; डिलर्सचा ३१ मे रोजी ‘नो पर्चेस डे‘

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : देशातील पेट्रोलियम डीलर्सनी ३१ मे रोजी ‘नो-पर्चेस दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्र सरकारकडून भरपाईची मागणी यानिमित्ताने करण्यात येणार आहे. नो पर्चेस डे असल्याने डीलर्स इंधन कंपन्यांकडून पेट्रोल खरेदी करणार नाही. मात्र, पंप सुरू राहणार आहेत. डीलर्सनी इंधन खरेदी न करण्याचा निर्णयामुळे काही ठिकाणी 'नो स्टॉक' बोर्ड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नो पर्चेस डेबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आज विदर्भ डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच ऑइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तातडीने याबाबत निर्णय घेण्याची विनंती त्यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच २०१७ पासून कंपन्यांनी डीलरच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. इंधनाचे दर वाढल्याने त्यांची गुंतवणूक वाढत असताना नफा कमी झालेला आहे. त्यामुळे कमिशनमध्येही वाढ करण्याची मागणी केलेली आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि डीलरचे कमिशन वाढविण्यासाठी ‘नो पर्चेस डेचे‘ हत्त्यार उपसले. देशभरातील सर्वच पंप चालक यात सहभागी होणार आहे.

इंधनावरील करांचा भार कमी केल्याने दर कमी होतील. मात्र, महागाईवर त्याचा फार तर अर्धा ते पाऊण टक्का परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या इंधन खर्चात बचत होऊ शकते. वाढलेल्या वस्तूंच्या किमती किती कमी होऊ शकतील, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, वाहतूकदारांची बैठक घेऊन यावर मार्ग काढणे अपेक्षित असल्याचे व्यावसायिक दीपेने अग्रवाल यांनी सांगितले.