Sion Hospital
Sion Hospital Tendernama
टेंडर न्यूज

BMC : सायन हॉस्पिटलबाबत मोठा निर्णय; तब्बल 2000 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अत्याधुनिक सुविधा, ऑपरेशन थिएटर, सीसीटीव्ही, डॉक्टरांसाठी निवासी संकुल, प्ले ग्राऊंड अशा अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून मुंबई महापालिकेच्या (BMC) शीव (सायन) रुग्णालयाचा कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च करण्यात येणार असून, महापालिकेने टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे.

सायन रुग्णालयाचा कायापालट तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित दोन टप्प्याचे काम वेळे आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण कामावर २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहर व पूर्व उपनगराजवळील सायन रुग्णालयात हे महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे.

पनवेल, अलिबाग या ठिकाणी अपघात झाल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे सायन रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करत खाजगी रुग्णालयाच्या तोडीस अशा प्रकारे सायन रुग्णालयाचा पुनर्विकास केला जात आहे. रुग्णालयाच्या पुढील दोन टप्प्यांतील कामासाठी राज्याच्या पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे.

शीव रुग्णालयासह शहरातील अन्य रुग्णालयांचा पुनर्विकास व अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. पर्यावरण विभागाने परवानगी दिल्याने रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास महापालिकेचे वास्तुशास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले. विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट हॉस्टेल इमारती 1,200 विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आहे, तर उर्वरित दोन टप्प्यांच्या कामात पुढील दोन वर्षांच्या आत अद्ययावत सोयीसुविधांसह रुग्णालय रुग्ण सेवेत असेल.

दोन टप्प्यांत होणार कायापालट

पहिला टप्पा

- नर्सिंग काॅलेज तळ अधिक + २०

- बॅरेक प्लाॅटवर दोन निवासी टाॅवर

- तळ अधिक २० मजली व तळ अधिक २४ मजली

दुसरा टप्पा

रुग्णालय इमारत

तळ अधिक ११ मजली