Drone
Drone Tendernama
विदर्भ

विदर्भातील 'या' 149 गावांत 120 ड्रोन का घेतायेत भराऱ्या?

टेंडरनामा ब्युरो

चिमूर (Chimur) : पंतप्रधान स्वामीत्व योजने अंतर्गत २५ जुलैपासून निवड झालेल्या चिमूर तालुक्यातील गावात गावठाण जमिनीचे चुना मार्किंग सुरू झाले आहे. या गावात गावठाण जमिनीचे जीआयएस प्रणालीवर आधारीत सर्वेक्षण व भूमापन ड्रोनच्या मदतीने होणार आहे. गावठाण जमिनीच्या सर्वेक्षणसाठी बुधवारी रोजी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या हस्ते शिवापूर (बंदर) येथून ड्रोन उडविण्यात आले. सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या १४९ गावांमध्ये ड्रोन जमिनीवरून १२० मीटर उंच उडणार आहेत.

जिल्ह्यातील इतर तालुक्याचे चुना मार्किंग गाव, गावठाण जमिनीचे सर्व्हेक्षण व भूमापन अंतिम टप्यात आहे. नागपूर विभागातील जिल्हा व तालुका स्तरावर सदर गावठाण ड्रोन सर्व्हे अंतर्गत ग्रामपंचायत व गावनिहाय मिळकतीचे सीमांकन करणे, मालमत्ता क्रमांक त्या-त्या मिळकतीनुसार समोर टाकन्यात येऊन दुसऱ्या दिवशी लगेच निवड झालेल्या गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. २५ जुलैपासून निवड झालेल्या गावांत चुना मार्किंग सुरू आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावरून दहा पथके व सर्व्हे ऑफ इंडियाची दोन पथके दाखल झाली आहेत. एका पथकाकडे दहा गावांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांचे सर्वेक्षण होणार नाही. चिमूर, शंकरपूर, आंबोली, नेरी, कवडशी (रोडी ), सावरगाव, जांभूळघाट, भिसी या गांवात सिटीसर्व्हे नगर भूमापन योजना सुरू आहे त्यामुळे या गांवात ड्रोन उडणार नाहीत. तर तालुक्यातील उर्वरीत १४९ गावात ड्रोन उडणार आहेत.