Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

राज्यातील सत्तांतर अन् वाळू तस्करीचा संबंध काय? मास्टर प्लॅन तयार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : वाळू चोरी आणि माफियांना रोखण्यासाठी जिल्हाधिका डॉ. विपीन इटनकर यांनी मास्टर प्लान (Master Plan) तयार केला आहे. पोलिस अधीक्षक आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीसुद्धा यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाळू माफियांचे काही खरे नाही असे दिसते.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कुठल्याही परिस्थिती वाळू व गौण खनीजची अवैध तस्करी रोखण्याचे निर्देश दिले. याकरिता काय काय उपाययोजना करता येतील याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार कुठल्या मार्गाने सर्वाधिक तस्करी होते याची याची यादी तयार करण्याची सूचना त्यांनी यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यानुसार सर्व तहसीलदारांकडून अवैध वाळू वाहतूक होणाऱ्या मार्गच्या यादी गोळा करून घेतली. तहसीलदारांकडून जवळपास ४२ रस्त्यांची यादी पाठविण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील जवळपास ३० रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यात येणार आहे. याची नावे लवकरच अंतिम केली जातील. या चेकपोस्टवर चोवीस तास सुरक्षा रक्षक राहणार आहे. त्याच प्रमाणे सीसीटीव्हीसुद्धा लावण्यात येणार आहे. वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागांना दिले.

वाळूवर अनेकांची नजर
जिल्ह्यात अनेक घाटांवरून वाळू उपसा करण्यावर निर्बंध आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचे सांगण्यात येते. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार होत असल्याची चर्चा आहे. अनेकांची नजर या वाळूवर आहे. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यात आघाडीवर आहेत. काही राजकीय नेत्यांचे नाव तर अनेकजण दबक्या आवाजात घेतात. राज्यात झालेल्या सत्तांतराचा परिणामही या वाळू धोरणावर होत असल्याची चर्चा रंगली आहे.